शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Thane: उल्हासनगर मनपा नगररचनाकार प्रकाश मुळे यांची हकालपट्टी? अनियमित बांधकाम परवाने दिल्याचा ठपका

By सदानंद नाईक | Updated: May 11, 2024 15:39 IST

Ulhasnagar News: उल्हासनगर शहर विकास आराखड्याचे उल्लंघन करून थेट रस्त्यावर व आरक्षित भूखंडावर बांधकाम परवानगी दिल्याचा ठपका ठेवून नगररचनाकार प्रकाश मुळे यांची आयुक्त अजीज शेख यांनी हकालपट्टी केली.

- सदानंद नाईकउल्हासनगर - शहर विकास आराखड्याचे उल्लंघन करून थेट रस्त्यावर व आरक्षित भूखंडावर बांधकाम परवानगी दिल्याचा ठपका ठेवून नगररचनाकार प्रकाश मुळे यांची आयुक्त अजीज शेख यांनी हकालपट्टी केली. मुळे यांनी दिलेल्या बांधकाम परवान्याची चौकशी करण्याचे संकेत आयुक्त शेख यांनी दिले आहे.

उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभाग पुन्हा वादात सापडले असून अनियमित बांधकाम परवाने, कोरोना काळातील ५० टक्के प्रिमियम शुल्कात अनियमितता आदींचा ठपका आयुक्त अजीज शेख यांनी नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्यावर ठेवला. तसेच तपासा दरम्यान हस्तक्षेप नको म्हणून मुळे यांची नगररचनाकार पदातून आयुक्तांनी कार्यामुक्त केले. संपूर्ण बांधकाम परवान्याची फेरतपासणी करण्याचे आदेश सहायक संचालक नगररचनाकार ललित खोब्रागडे यांना आयुक्तांनी दिले असून या आदेशाने संबंधित महापालिका अधिकारी, बिल्डर, वास्तुविशारद, राजकीय नेते आदी मध्ये खळबळ उडाली आहे. मुळे यांनी शहर विकास आराखड्या नुसार बांधकाम परवानगी दिली नसून काही बांधकाम परवाने चक्क रस्त्यावर दिल्याचे उघड झाले आहे. 

महापालिकेची कोणत्याही परवानगी विना खाजगी कर्मचाऱ्यांना नगररचनाकार विभागात कामाला ठेवल्या प्रकरणी प्रकाश मुळे यांच्यासह ४ जणांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तसेच मुळे यांच्या विरोधात शासनाकडे नागरिकांना तक्रारी केल्याने, त्या तक्रारीचा निपटारा महापालिकेला करावा लागत आहे. तर दुसरीकडे महापालिकेच्या नगररचनाकार विभागाकडून सलग दोन वर्षे सर्वाधिक ५५ कोटीचे उत्पन्न मुळे यांनी मिळून दिले होते. बांधकाम परवाना देण्याच्या प्रक्रियेत मुळेसह अन्य कर्मचारी व अधिकाऱ्याचा समावेश असतो. त्या संबंधितांवर महापालिका आयुक्त अजीज शेख काय कारवाई करतात. याकडे सर्वांचें लक्ष लागले आहे.

संपूर्ण बांधकाम परवान्याची चौकशी - आयुक्त अजीज शेख महापालिका नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी शहर विकास आराखड्यानुसार इमारतीला बांधकाम परवानगी मध्ये अनियमितता आढळली असून नागरिकांच्या मोठया प्रमाणात तक्रारी आहेत. तसेच कोरोना काळातील ५० टक्के प्रिमियम शुल्कातही अनियमितता आहे, बांधकाम परवान्याची चौकशी आदेश दिले.

माजी नगररचनाकार करपे यांचा शोध लागेना?  महापालिका नगररचनाकार विभाग नेहमी वादात राहिला असून बहुसंख्य नगररचनाकारांनी जेलची हवा खाल्ली आहे. तर बांधकाम परवण्यावर सही न करणारे तत्कालीन नगररचनाकार संजीव करपे सन-२०१६ पासून खालापूर घाटातून बेपत्ता झाले. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गेल्या ९ वर्षात त्याचा शोध लागला नाही.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे