शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या मेट्रोचा लवकरच कल्याणपर्यंत विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 02:45 IST

मेट्रोचा पहिला टप्पा दृष्टिपथात आला आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने सिडकोने खांदेश्वर ते तळोजा या दुसºया टप्प्यातील प्रकल्पासाठी चाचपणी सुरू केली आहे.

कमलाकर कांबळे नवी मुंबई : मेट्रोचा पहिला टप्पा दृष्टिपथात आला आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने सिडकोने खांदेश्वर ते तळोजा या दुसºया टप्प्यातील प्रकल्पासाठी चाचपणी सुरू केली आहे. तिसºया टप्प्याच्या मार्गातील काही तांत्रिक अडचणी लक्षात घेता सिडकोने आता तळोजा ते कल्याण या चौथ्या टप्प्याचा विचार सुरू केला आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी ‘लोकमत’ला दिली.सिडकोने २0११ मध्ये नवी मुंबई मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. तीन टप्प्यांत पूर्ण होणारा हा मेट्रो प्रकल्प २१.४५ किमी लांबीचा आहे. त्यासाठी चार हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी बेलापूर-खारघर-तळोजा-पेंधर या ११ कि.मी. लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर एकूण ११ स्थानके आहेत. या पहिल्या टप्प्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. सप्टेंबर २0१८ मध्ये या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचा निर्धार सिडकोने केला. त्यासाठी चिनी बनावटीच्या मेट्रो खरेदी केल्या आहेत. त्यापैकी दोन मेट्रो कोच पुढील महिन्यात ट्रायलसाठी सिडकोच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.दुसरा टप्पा ८.३५ कि.मी. लांबीचा आहे. तळोजा एमआयडीसी-कळंबोली-खांदेश्वर मार्गे आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा मार्ग जोडला जाणार आहे. त्यासाठी सुमारे दीड हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे एकूण मार्गापैकी तीन ते चार किमीचा मार्ग एमआयडीसी क्षेत्रातून जाईल. त्यासाठी एमआयडीसीही अनुकूल आहे. त्यामुळे दुसºया टप्प्यालाही लवकरच सुरूवात होण्याचा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. पहिल्या दोन टप्प्यांना जोडण्यासाठी पेंधर ते एमआयडीसी दोन किमी लांबीचा तिसरा टप्पा प्रस्तावित आहे. परंतु, पहिला आणि दुसरा टप्पा पूर्ण होईपर्यंत तिसºया टप्प्याचे काम सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे व्यवहारिकदृष््या सोयीचा ठरणारा तळोजा ते कल्याणपर्यंतचा सुमारे २३ किमी लांबीचा मेट्रोच्या चौथ्या टप्प्याचे काम सुरू करण्याचा सिडकोचा निर्णय आहे. यासंदर्भात अलीकडेच संबंधित विभागाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे गगराणी म्हणाले.पुढच्या वर्षी बेलापूर ते पेंधर मेट्रोची प्रत्यक्ष सेवा सुरू होईल, असा विश्वास सिडकोला आहे. उर्वरित दोन टप्प्यांचे काम पूर्ण होईतो पहिल्या टप्प्याचा विस्तार कल्याणपर्यंत केल्यास अधिक उपयुक्त ठरेल, असे सिडकोला वाटते.