शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी तहसीलदार कार्यालय प्रांगणात रान भाज्यांचे प्रदर्शन व विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 20:20 IST

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून भिवंडी तहसीलदार कार्यलय प्रांगणात कृषी विभागा तर्फे महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत नोंदणी असलेल्या महिला बचतगटांच्या पुढाकाराने रानभाज्या प्रदर्शन व विक्री कार्यक्रमांचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते.

नितिन पंडीतभिवंडी ( दि. ९ ) जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून भिवंडी तहसीलदार कार्यलय प्रांगणात कृषी विभागा तर्फे महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत नोंदणी असलेल्या महिला बचतगटांच्या पुढाकाराने रानभाज्या प्रदर्शन व विक्री कार्यक्रमांचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते.

शहरात राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात जंगलात उगवणाऱ्या खास रान भाज्यांची ओळख नसल्याने या पौष्टिक भाज्या खाणे टाळल्या जात असतात.या रान भाज्यांची ओळख सर्वांना व्हावी या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या रान भाज्या प्रदर्शन व विक्री स्टॉल ठिकाणी करटोली, खुरासणी,अळूची पाने ,कुर्डु ,आधाडा ,बाफळी ,काटे माठ ,पेंढरु ,कवदर ,भारंगी अशा विविध रानभाज्या विक्री साठी ठेवण्यात आल्या होत्या.

तालुक्यातील विविध महिला बचत गटांच्या माध्यमातून या रान भाज्या विक्री साठी प्रदर्शन ठेवण्यात आले होते.विशेष म्हणजे या सर्व रान भाज्या जंगलात सेंद्रिय खतावर उगवलेल्या असून या भाज्यांची आरोग्य विषयक वैशिष्ट्य सुद्धा नागरीकांना सांगितली जात होती. त्या माध्यमातून या भाज्यांची काही वेळातच हातोहात विक्री झाली . या रानभाज्या प्रदर्शन व विक्री स्टॉल चे उद्घाटन भिवंडी पंचायत समिती सभापती रवी पाटील व तहसीलदार अधिक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी गणेश बांबळे, कृषी मंडळ अधिकारी दयावंती कदम,कृषी पर्यवेक्षक किशोर गायकवाड, कुरकुरे,प्रदीप निकम,विवेक दोंदे, व गुजर पंचायत समिती उपसभापती गजानन असवारे, व आदी मान्यवर उपस्थित होते.

 

टॅग्स :bhiwandiभिवंडी