शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

दरवर्षी ३२ टक्के रुग्ण हृदयरोगामुळे दगावतात, डॉ. अनुप ताकसांडेंची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 7:50 PM

- राजू काळे भाईंदर, दि. १८ - भारतातदरवर्षी होणाऱ्या  एकूण मृत्यूंपैकी तब्बल ३२ टक्के मृत्यू हृदयरोगामुळे होतात आणि यामधील ७० टक्के नागरिकांचा हृदयविकाराचा झटका आल्यांनतर योग्य ते उपचार न केल्यामुळे मृत्यू होते, अशी माहिती मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयातील हृदयविकार तज्ञ डॉ. अनुप ताकसांडे यांनी एका वैद्यकीय मोहिमेद्वारे दिली. हृदयविकाराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २९ सप्टेंबरला जागतिक ...

- राजू काळे 

भाईंदर, दि. १८ - भारतातदरवर्षी होणाऱ्या  एकूण मृत्यूंपैकी तब्बल ३२ टक्के मृत्यू हृदयरोगामुळे होतात आणि यामधील ७० टक्के नागरिकांचा हृदयविकाराचा झटका आल्यांनतर योग्य ते उपचार न केल्यामुळे मृत्यू होते, अशी माहिती मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयातील हृदयविकार तज्ञ डॉ. अनुप ताकसांडे यांनी एका वैद्यकीय मोहिमेद्वारे दिली. 

हृदयविकाराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २९ सप्टेंबरला जागतिक हृदयदिन साजरा केला जातो. परंतु, हृदयविकाराची वाढणारी रुग्णाची संख्या पाहता  दरमहिन्याला हृदयदिन साजरा करणे आवश्यक वाटू लागल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अधिक माहिती देताना त्यांनी हृदयाचा झटका अथवा रुग्णाच्या छातीत दुखू लागल्यावर पुढील ५० ते ६० मिनिटे "गोल्डन हवर" असतात. त्या कालावधीत हृदयाच्या स्नायूला रक्त मिळण्यासाठी होत असलेला  रक्तवाहिनीतील अडथळा हळूहळू वाढत जातो. सहा तासातच हृदयावर गंभीरपरिणाम होऊन ते बंद होते, अशावेळी रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी ‘पामी’ (प्रायमरी अँजिओप्लास्टी इनमायोकार्डियल इनफारक्शन) ही सर्जरी करणे, हा  वैद्यकीय जगतात खात्रीचा उपचार समजला जातो. हा एंजियोप्लास्टीचा प्रकार असून ज्यामध्ये रक्तवाहिन्याना (कोरोनरी धमन्या) पूर्ववत रक्त पुरवठा करण्यासाठी एक बलून व स्टेण्ट वापरला जातो. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत तरूण वयामध्ये हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला ‘पामी’ या पद्धतीचा भरपूरफायदा होतो. हा उपचार त्वरित केल्यावर रुग्णांचा पुढील ९० मिनिटांतील मृत्यूचा धोका कमी होतो. हृदयविकाराची लक्षणे जाणवल्यावर दोनतासांत (गोल्डन अवर) त्याला रुग्णालयात पोहोचविणे अत्यंत आवश्यक असते.  सरासरी ८३ टक्के रुग्ण रुग्णालयात वेळेवर पोहोचत नसल्यामुळे ते दगावत असल्याचे मुंबईच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या संशोधनात आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रुग्णालयाचे केंद्र प्रमुख रवी हिरवाणी यांनी सांगितले कि, गेल्या काही दशकांमध्ये भारतात कोरोनरी आर्टरी रोग (सीएडी) म्हणजेच हृदयविकाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. आपल्या जीवनशैलीत झालेल्या बदलामुळे स्थूलता, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित असणारे आजार वाढीस लागले आहेत.  वैद्यकीय संशोधनात अद्ययावत प्रगती झाल्याने  ‘गोल्डन अवर’ मध्ये हृदयविकार रुग्णांना त्वरित उपचार उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या मृत्यूची संख्या कमी करण्यास  मदत होऊ शकते.