शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील प्रत्येक रिक्षा चालक एक स्वच्छता दुत बनू शकतो : आयुक्त काटकर

By धीरज परब | Updated: October 11, 2023 17:47 IST

शहरातील सर्व रिक्षा चालक हा एक स्वच्छता दुत बनू शकतो अशी अपेक्षा आयुक्त संजय काटकर यांनी व्यक्त केली. 

मीरारोड - मीरा भाईंदर महानगरपालिका व न्यु मिरा भाईंदर रिक्षा चालक मालक संघ ट्रेड युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद स्वच्छतेचा हा उपक्रम साजरा करण्यात आला. शहरातील सर्व रिक्षा चालक हा एक स्वच्छता दुत बनू शकतो अशी अपेक्षा आयुक्त संजय काटकर यांनी व्यक्त केली. 

११ ऑक्टोबर रोजी "संवाद स्वच्छतेचा" ही विशेष बैठक आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर व संभाजी पानपट्टे, उपायुक्त मारुती गायकवाड,  संजय शिंदे व रवि पवार, शहर अभियंता दिपक खांबित, माजी नगरसेवक जुबेर इनामदार, रिक्षा चालक संघाचे प्रतिनिधी, महापालिका कर्मचारी व रिक्षा चालक उपस्थित होते.

 शहराच्या स्वच्छतेबाबत आपण सर्व रिक्षा चालक कसे योगदान देऊ शकतात याबाबत ही विशेष बैठक घेण्यात आली. चालत्या रिक्षातून किंवा गाडीतून कचरा फेकणे, गुटखा/पान खाऊन थुंकणे, सिगारेटचे जळते तुकडे फेकणे या सर्व अस्वच्छता पसरवणाऱ्या गोष्टी दररोज रिक्षा चालक पाहत असतो. यावर वेळीच आळा घालण्यासाठी एक सुरुवात स्वतःपासून म्हणून आपण सर्व रिक्षा चालक महापालिकेला सहकार्य करू शकता असे आयुक्त यांनी आवाहन केले. 

सर्व रिक्षा चालक हे त्यांच्या दैनंदिन जीवनात रिक्षामधून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करून शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी महत्त्वाचे कार्य करू शकतात. एखाद्या प्रवाश्या कडून असे कृत्य घडत असल्यास आपण एक स्वच्छता दुत बनून त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देऊ शकतो.  शहरातील सर्व रिक्षांमध्ये लहान आकाराची कचरा कुंडी लवकर बसवण्यात येणार आहे असे आयुक्त यांनी सांगितले. 

 प्रत्येक सुजाण नागरिकांनी स्वच्छतेप्रती जागरूक होऊन हे शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त संजय काटकर यांनी केले.