शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात दर १८ मिनिटाला भटक्या कुत्र्यांचा चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 02:41 IST

ठाण्यात भटक्या कुत्र्यांची दहशत पुन्हा एकदा वाढू लागली असून गेल्या आठवड्यात एकाच दिवशी कुत्र्याने चार जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे

ठाणे : ठाण्यात भटक्या कुत्र्यांची दहशत पुन्हा एकदा वाढू लागली असून गेल्या आठवड्यात एकाच दिवशी कुत्र्याने चार जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. ठाण्यात दर अठराव्या मिनिटाला भटका कुत्रा एकाचा चावा घेत असल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकाराद्वारे उघड झाली आहे.पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत २००४ पासून आतापर्यंत ५० हजारांहून अधिक भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. परंतु, अद्यापही सुमारे १५ हजार कुत्र्यांवरील शस्त्रक्रिया बाकी असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.मागील वर्षी एकाच महिन्यात भटक्या कुत्र्यांनी १३०० जणांचे लचके तोडले. मागील कित्येक वर्षांपासून या या कुत्र्यांचा सर्व्हे होणे बाकी आहे. शहरात आजमितीला नेमके किती भटके कुत्रे आहेत, याची माहिती आरोग्य विभागाला नाही. सर्व्हेच्या प्रस्तावाला २०१५ मध्ये मंजुरी मिळाली. परंतु, अद्यापही तो झालेला नाही. शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या आसपास असून या लोकसंख्येच्या दोन ते तीन टक्के भटक्या कुत्र्यांची संख्या असू शकते, असा अंदाज आहे. तसेच कुत्र्यांची जननक्षमता लक्षात घेता अंदाजे प्रतिमहिना २५० ते ३०० कुत्र्यांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया केल्या जातात.परंतु, असे असले तरी आजही भटक्या कुत्र्यांची दहशत कायम आहे. आता मुंबईच्या वेशीवरील कुत्रेदेखील ठाण्यात आणून सोडले जात असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यांची दहशत केवळ हिरानंदानी भागातच नव्हे तर अनेक झोपडपट्टी भागांत दिवसेंदिवस ती वाढत आहे.महापालिका हद्दीतील सुमारे १५ हजार भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करणे शिल्लक असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात पालिका हद्दीत कुत्र्यांची संख्या सुमारे ७५ ते ८० हजार असल्याचे दावे केले जात आहेत. यासंदर्भात सत्यजित शहा यांना माहिती अधिकारात सांगितलेला तपशील धक्कादायक आहे. मागील काही वर्षांत श्वानदंशांच्या घटनांमध्ये वाढ तर झाली आहेच, शिवाय चावा घेण्याचा कालावधीही कमी झालेला आहे. २०१०-११ मध्ये कुत्र्याच्या दोन चाव्यांमधील अंतर ५३ मिनिटांचे होते. २०१७ मध्ये ते ३५ मिनिटांवर आले. तर, आजघडीला ते १८ मिनिटांवर आले आहे. पालिकेने श्वानदंशाची जी आकडेवारी दिली आहे त्यात केवळ शासकीय रुग्णालयांत उपचार घेणाऱ्यांचीच संख्या आहे. खाजगी दवाखान्यांचा उल्लेख नाही. त्यामुळे श्वानदंशाच्या दोन घटनांमधील अंतर याहून कमी असू शकते.