शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

संपणार कधी या भग्न शिल्प अन शिलालेखांचा वनवास ?

By admin | Updated: June 21, 2016 00:50 IST

वसईला शेकडो वर्षाचा ऐतीहासीक वारसा लाभलेला आहे.एकेकाळी शूर्पारक म्हणून प्रसिद्ध असलेली ही भूमी पुरातन शिल्प, शिलालेखांनी समृध्द होती.

विरार : वसईला शेकडो वर्षाचा ऐतीहासीक वारसा लाभलेला आहे.एकेकाळी शूर्पारक म्हणून प्रसिद्ध असलेली ही भूमी पुरातन शिल्प, शिलालेखांनी समृध्द होती. वसईत आजही अनेक पुरातन वास्तू, मंदिरे जागोजागी उभ्या आहेत. रामायण, महाभारत, बौद्ध, जैन, सातवाहन, गौतमीपुत्र ,शतकर्णी, शिलाहार, राजा बिम्बदेव, मुघल व पोर्तुगीज ह्या काळात व राजविटमध्ये येथे अनेक शिल्पस्थापत्य कला उदयास आल्या. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी कला, संगीत, शिल्प, साहित्य याबरोबरच ज्ञान-विज्ञानाच्या निर्मितीचा कळसही या प्रदेशाने अनुभवला आहे.वसईत ठिकठिकाणी खोदकाम करताना किंवा तलावांतून मिळालेली शिल्प वा शिलालेख इतिहासाची साक्ष देणारी आहेत. पूर्वी हाच शूर्पारक म्हणून नावलौकीक असलेला परिसर ‘पवित्र तीर्थक्षेत्र’ म्हणून भारतवर्षात प्रसिद्ध होता. या भूमीत असलेल्या १०८ तलाव पवित्र तीर्थ असल्याचे लोक मानत असत. काही तलावांना स्नानासाठी दगडी घाट देखील बांधलेले होते. त्यावर सुंदर अशी शिल्प देखील होती. नक्षीदार मूर्ती व शिल्पपटांनी संपन्न २०० हून अधिक मंदिरे होती. काळाच्या ओघात व परकीय आक्रमणात यातील बरीच मंदिरे नष्ट झाली. कालांतराने मंदिरांतील भग्न झालेल्या मूर्तींचे विर्सजन तलावांत करण्यात आले होते, नंतरच्या पिढींना तलावात खोदकाम करताना किंवा विहीरींतील गाळ काढताना हा पुरातन ठेवा सापडला गेला. तो पुन्हा बाहेर काढून ठेवण्यात आला. हा बाहेर काढून ठेवलेला अनमोल ठेवा त्यानंतर कायम दुर्लक्षीतच राहिला. आजही अशा कित्येक भग्न मूर्ती/शिल्प व शिलालेख वसई-विरार परीसरात बेवारस अवस्थेत रस्त्याच्या कडेला किंवा मंदिराच्या बाजुला अडगळीत पडलेला आढळतो. निर्मळ येथील सुळेश्वर मंदिर व सोपारा येथील चक्रेश्वर मंदिर परिसरात अशा असंख्य भग्न मूर्त्या व शिलालेख आपल्याला पहायला मिळतील.वसई-विरार परीसरात असे कुठलेच संग्रहालय सध्या तरी अस्तित्वात नाही. वसईत अनेक ठिकाणी बेवारसपणे पडलेला हा अनमोल ठेवा आपल्या पुढच्या पिढीसाठी जतन करून ठेवावा अशी मागणी आता नागरीकांकडून होत आहे. तलाव सुशोभीकरण, मँरेथॉन स्पर्धा, माहि वसई महोत्सव व वसई विजयोत्सवावर लाखो रूपये खर्च करणाऱ्या महापालिकेने वसईत कायम स्वरूपी संग्रहालय बनवून हा अनमोल असा ऐतिहासीक ठेवा लवकरात लवकर जतन करून ठेवण्यात यावा असे लोकांकडून सांगण्यात येत आहे. (वार्ताहर) एके काळी या मूर्ती/शिल्प देवालयाची प्रतिष्ठा होत्या. त्यांची सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा होत असे. पण आता इतिहासाची साक्ष देणारी ही शिल्प, मूर्ती व शिलालेख सध्या आपले अिस्तत्वच हरवून बसलेली आहेत. मोडी लिपीत कोरलेल्या शिलालेखांचा काही ठिकाणी चक्क कपडे धुण्यासाठी वापर केला जात आहे हे ऐकून विश्वासही बसणार नाही. काल-परवापर्यंत द्रुष्टीस पडणारा हा ऐतिहासिक ठेवा हळूहळू वसईतून गायब होत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या पुरातन वस्तूंना मागणी असल्यामुळेच गेल्या काही वर्षात हा अनमोल ठेवा चोरला तर जात नाही ना अशी भीती लोकांना वाटू लागली आहे.