शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कुर्गचा दौरा झाला रद्द, भाजपावर टीकेची झोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 02:07 IST

नागरिकांवर केलेली करदरवाढ, पालिकेवरील कर्जाचा डोंगर, निधीअभावी विकासकामांना कात्री, कर्मचारीकपातीची नामुश्की असताना नगरसेवकांच्या पर्यटन दौऱ्यावरून

मीरा रोड : नागरिकांवर केलेली करदरवाढ, पालिकेवरील कर्जाचा डोंगर, निधीअभावी विकासकामांना कात्री, कर्मचारीकपातीची नामुश्की असताना नगरसेवकांच्या पर्यटन दौऱ्यावरून सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठली होती. महापौरांपासून अन्य पदाधिकाºयांनी दौºयांचे समर्थन केले होते. परंतु, आता मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नगरसेवकांचा कर्नाटकमधील कुर्ग या पर्यटनस्थळी जाणारा दौरा अखेर गुंडाळला आहे. या दौºयाच्या निविदा रद्द केल्याचे प्रशासन सांगते, तर आमदार नरेंद्र मेहतांनी नगरसेवकांचे कान टोचल्याने हा दौरा गुंडाळल्याचे भाजपाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.महिला बालकल्याण समितीचा दार्जिलिंग येथे, तर वृक्ष प्राधिकरण समितीचा नैनीताल-डेहराडून या पर्यटनस्थळी प्रत्येकी १० लाख खर्चून, तर मेमध्ये सर्व नगरसेवकांचा कुर्ग येथे दौरा होता. ४५ लाख खर्च दौºयावर येणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने देताच विविध स्तरांतून या दौºयांना विरोध झाला. काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी, तर काँग्रेसचे सर्व १२ नगरसेवक दौºयाला जाणार नाहीत, अशी भूमिका घेतली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, मनसे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे, जिद्दी मराठा संस्थेचे प्रदीप जंगम, सत्यकामचे कृष्णा गुप्ता आदींनी दौरा रद्द करण्याचे पत्र देत भाजपावर टीका केली होती. तर, भाजपाच्या माजी महापौर गीता जैन यांच्यासह विरोधी पक्षनेते राजू भोईर, दीप्ती भट, नीलम ढवण, शर्मिला बगाजी, अनिता पाटील, भावना भोईर, धनेश पाटील आदींनी दौºयाला विरोध केला.या दोन दौºयांचा सविस्तर अहवाल अद्याप संबंधित अधिकारी तसेच नगरसेवकांनी दिलेला नाही. पालिकेनेही तो संकेतस्थळावर टाकलेला नाही. या दौºयांचा खर्च संबंधित नगरसेवक, अधिकाºयांकडून वसूल करण्याची मागणी होत आहे. मेहता यांनी मात्र नगरसेवकांच्या आढावा बैठकीत कुर्ग दौरा करू नका. दौºयावरून वातावरण तापले असल्याने नंतर पाहू, अशी भूमिका घेतल्याचे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांनी कुर्ग दौरा रद्द केल्याचे सांगत सुमारे ४५ लाख खर्चाच्या दौºयाचे कंत्राट मागवले होते. निविदाही आल्या होत्या. पण, त्या रद्द केल्याचे म्हणाले. ५५ ते ६० नगरसेवकांनी होकार दर्शवला होता.