शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

युती झाली तरीही दुरावाच

By admin | Updated: November 12, 2015 01:46 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजपची युती झाली असली तरीही त्यांच्यातली दरी मात्र अजूनही कायम असल्याचे बुधवारी दोन्ही शहरांमध्ये शिवसेना आणि भाजपाने ठिकठिकाणी आपापले

अनिकेत घमंडी, डोंबिवली कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजपची युती झाली असली तरीही त्यांच्यातली दरी मात्र अजूनही कायम असल्याचे बुधवारी दोन्ही शहरांमध्ये शिवसेना आणि भाजपाने ठिकठिकाणी आपापले स्वतंत्र झेंडे लावून केलेल्या ‘भगवे’करणातून दिसून आले. त्यातही विशेष म्हणजे शिवसेनेच्या एकाही होर्डिंग्ज-बॅनरवर भाजपच्या नेत्यांचा नामोल्लेख नव्हता की, युतीचा संदर्भ. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब हजर असतानाही घडलेल्या या दुफळीच्या प्रदर्शनामुळे केवळ पक्षश्रेष्ठींच्या आग्रही भूमिकेखातर महापालिकेत झालेली ही युती स्थानिक नेत्यांवर लादण्यात आली आहे का, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. कल्याणमध्ये जेथे बघावे तेथे भगवे झेंडे लावण्यात आले होते. त्यातच ठिकठिकाणी होर्डिंग्ज-बॅनर होते. त्या सर्वांतून केवळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आदी प्रमुख नेत्यांसह खासदार श्रीकांत शिंदे आदींचे फोटो होते. मात्र, त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या शहरांमधील भाजपचे स्थानिक नेते आदींचा अभाव होता.या भगवेकरणातून शिवसेनेला महापालिकेवर आपलेच वर्चस्व असल्याचे ठासून सांगायचे होते.त्या दृष्टीनेच कल्याण रेल्वे स्थानकापासून दुर्गाडीपर्यंत आणि टिळक चौक-गांधी चौक आदींपासून महापालिकेपर्यंत सर्वत्र भगवेकरण करण्यात आले होते. मित्रपक्ष भाजपला पूर्णपणे बाजूला ठेवून शिवसैनिकांनी जल्लोषाची तयारी केली होती. भाजपला मागील वेळेच्या तुलनेत एवढ्या जागा मिळूनही अखेरीस त्यांना उपमहापौरपदावरच सध्या तरी समाधान मानावे लागल्याचीही चर्चा महापालिका इमारतीबाहेर जमलेल्यांमध्ये रंगली होती. अशीच काहीशी स्थिती डोंबिवलीतही दिसून आली. ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार जिंकले आहेत, त्या प्रभागांंमध्ये नागरिकांच्या लक्षात येतील अशा ठिकाणी झेेंडे लावले होते. विशेषत: इंदिरा गांधी चौक, सावरकर रोड, टिळक पथ, टिळकनगर, गोग्रासवाडी, मानपाडा रोड तसेच एमआयडीसीचा हमरस्ता आदी ठिकाणी भाजपा झेंड्यांचे भगवेकरण दिसून आले. दुर्गाडी किल्ल्याचा परिसरही भगवा झाला होता. डोंबिवलीच्या गणेश मंदिर परिसरातही तेच चित्र होते. या दोन्ही ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भेट दिली. काही काळ नागरिकांशी चर्चा केली आणि महापौरपद शिवसेनेलाच मिळाल्याबद्दल नागरिकांचे जाहीर आभार मानले. महापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर महापालिकेसह कल्याणमध्ये शिवसैनिकांनी ठिकठिकाणी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसह धर्मवीर आनंद दिघे यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.महापालिका मुख्यालयातून बाहेर पडतानाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्याची भेट घेतली नाही, याचीही सर्वत्र जोरदार चर्चा सुरू होती.