शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

युती झाली तरी राडेबाजी सुरूच

By admin | Updated: November 14, 2015 03:31 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्तेसाठी शिवसेना भाजपा एकत्र आले तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडेबाजी सुरूच आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्तेसाठी शिवसेना भाजपा एकत्र आले तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडेबाजी सुरूच आहे. येथील पूर्वेकडील महालक्ष्मी शॉपिंग सेंटरच्या परिसरात बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांना मारहाण केल्याची घटना घडली. यात शिवसेनेचे प्रमोद ओहाळ आणि जितेंद्र प्रसाद हे दोन कार्यकर्ते जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी विशाल जाधव, सचिन जाधव, अनंत गायकवाड आणि शेखर क्षीरसागर यांच्यावर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे केले आहेत. युतीचा महापौर विराजमान होऊन काही तासांचा कालावधी उलटत नाही तोच ही घटना घडली. जाईबाई विद्यामंदिर प्रभागात शिवसेनेचे उमेदवार रमेश जाधव यांनी भाजपाचे उमेदवार संदीप जाधव यांचा पराभव केला आहे. पराभूत झाल्याचा राग मनात धरून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप ओहाळ यांनी केला आहे. ओहाळ यांना त्यांचा मित्र नितीन जाधव याने फोन करून आपल्याला मारहाण होत असल्याची माहिती दिली. त्यामुळे ओहाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना लोखंडी पाइपने जबर मारहाण करण्यात आली. त्यांच्यासह जितेंद्र आणि नितीन या त्यांच्या मित्रांनाही चौघांनी मारहाण केली. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून भाजपा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)