शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीला जखमी करणारा आरोपी भाजपचा पदाधिकारी असता तरी त्याची गय केली नसती!- चित्रा वाघ

By जितेंद्र कालेकर | Updated: December 19, 2023 21:31 IST

एसआयटी पीडितेचा पुन्हा जबाब नोंदविणार

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: प्रेयसीला मारहाण करून नंतर तिला कारची धडक देणारा अश्वजित गायकवाड हा पूर्वी भाजपा युवा मोर्चाचा पदाधिकारी होता. आता त्याचा भाजपशी कोणताही संबंध नाही. जरी तो भाजपचा पदाधिकारी असता, तरी पक्षाने त्याची गय केली नसती, असे भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितले.या प्रकरणातील पीडितेची सोमवारी रात्री त्यांनी रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर त्या माध्यमांशी बाेलत होत्या.

कोणालाही पाठीशी घालण्याची सरकारची भूमिका नसल्याचे यावेळी वाघ यांनी स्पष्ट केले. तिची प्रकृती सुधारत आहे. या मारहाण आणि कार पायावरून नेण्याच्या घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी घेतली आहे. सखोल तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे. तिच्यासह तिच्या कुटुंबीयांशी, तसेच कासारवडवली पोलिसांशी आपले बोलणे झाले आहे. तपास करणारी एसआयटी तिचा पुन्हा जबाब नोंदविण्याची कार्यवाही करीत आहेत. त्यानुसार पुन्हा कासारवडवली पोलिस गुन्ह्यात कलमे वाढवून पारदर्शक कारवाई करतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

अश्वजित हा पालघर युवा मोर्चाचा चार वर्षांपूर्वी पदाधिकारी होता. आता त्याचा भाजपशी कोणताही संबंध नसल्याचा खुलासा वाघ यांनी केला आहे. तो जरी भाजपचा पदाधिकारी असता तरीही गंभीर गुन्ह्यात कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नसून, नि:पक्षपणे या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचेही वाघ यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघ