शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनचे नाव काढले तरी अंगावर येतो काटा; ठाण्यातील नागरिकांनी मांडले मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:30 IST

ठाणे : लॉकडाऊन नको रे बाबा! त्याचे नाव ऐकले तरी अंगावर काटा येतो, अशा प्रतिक्रिया ठाणेकरांनी व्यक्त केल्या आहेत. ...

ठाणे : लॉकडाऊन नको रे बाबा! त्याचे नाव ऐकले तरी अंगावर काटा येतो, अशा प्रतिक्रिया ठाणेकरांनी व्यक्त केल्या आहेत. गर्दी टाळण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही, त्यासाठी अनेक उपाययोजना सरकारला करता येऊ शकतात. लॉकडाऊन आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही, अशी नाना तऱ्हेची मते ठाणेकरांकडून व्यक्त होत आहेत. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर लोकांनी नियमांचे पालन केले नाही, तर लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी दिला. त्याबद्दल सर्वसामान्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी कोरोनाची साथ सुरू झाली तेंव्हा आधी केंद्राने आणि नंतर राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. त्याचे बरे-वाईट परिणाम सगळ्यांनी विशेषतः सर्वसामान्य लोकांनी भोगले. आता पुन्हा बाधितांची संख्या वाढत आहे. (खरंच? सरकारी कामकाज संशयास्पद आहे!) म्हणून लॉकडाऊन करणे म्हणजे शासन आणि प्रशासनाने जबाबदारी टाळणे होईल. लोक ऐकत नाहीत ही सबब शासनाने सांगू नये, उपाययोजना करावी. गर्दी टाळण्यासाठी करण्यासारखे खूप काही आहे. सत्ता आणि यंत्रणा ताब्यात असलेले शासन ते करू शकते. पण, इच्छाशक्तीचा अभावच दिसतोय. - मकरंद जोशी, पर्यटन व्यवसायिक...

पुन्हा लॉकडाऊन नकोच. कारण आता अर्थव्यवस्था सुरळीत होत आहे. जनसामान्य माणूस आधीच अनेक जबाबदाऱ्यांखाली आणि महागाई, कर इत्यादीने वाकला आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांना लॉकडाऊन परवण्यासारखे नाही. एवढेच नाहीतर, लोक याच्या विरोधात आहेत आणि जर जबरदस्ती झाली तर लोक आंदोलन करतील. त्यापेक्षा सरकारने त्यावर ठोस निर्णय घ्यायला हवे.    - सुमुख राजे,     व्यवस्थापक, खाजगी कंपनी

आर्थिकदृष्ट्या लॉकडाऊन परवडणारा नाही, कारण ठाण्यात हातावर पोट असणारे शेकडो लोक आहेत. त्याला पर्याय म्हणून काही निर्बंध घालता आले तर योग्य होईल. आता कुठे व्यवसाय, उद्योग नीट सुरळीत होऊ लागले असताना, हा पर्याय पुन्हा अनेक अडचणी वाढवणारा ठरू शकतो.    - डॉ. क्षितिज कुलकर्णी, ज्येष्ठ     लेखक, नाट्य दिग्दर्शक

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस