शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षांनंतरही साकरमाचीचे पुनर्वसन नाही; कुडाच्या शेडमध्ये ग्रामस्थांचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 01:06 IST

मुरबाड तालुक्यात आसरा : वन्यप्राण्यांमुळे भीतीचे वातावरण

श्याम राऊतमुरबाड : पुणे जिल्ह्यातील माळीण गावातील दुर्घटना घडल्यानंतर भीमाशंकर अभयारण्यातील साकरमाची प्रकाशझोतात आली. एरव्ही, कुणाच्या खिजगणतीला नसलेल्या या वस्तीला मुरबाड तालुक्याच्या शेजारील लांबाचीवाडी येथे तात्पुरते पत्र्याचे, कुडाचे शेड उभे करून आधार दिला आहे. सात वर्षे होत आली, तरी अद्याप पुनर्वसन न झाल्याने रहिवाशांना वन्यप्राणी, साप, विंचवांच्या सान्निध्यात राहण्याची वेळ आली असल्याचे महिलांनी ‘लोकमत’ला सांगितले.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर मातीचा डोंगर कोसळून गाव गाडले गेले. येथील निसर्गाचा कोप पाहून माळीणप्रमाणेच भीमाशंकर अभयारण्यातील साकरमाची गावालाही धोका होता. कागदावर हे गाव पुणे जिल्ह्यात दाखवले जात असले, तरी व्यवहार मुरबाड तालुक्यातच होतात. माळीणची घटना घडली आणि सरकारला जाग येऊन येथील २० ते २५ कुटुबांचे तात्पुरते पुनर्वसन मुरबाड येथील लांबाचीवाडी येथे केले. साधी पत्र्याची शेड उभी केली. सात वर्षे होत आली तरी कायमची व्यवस्था होत नसल्याने आजही त्या कुटुंबांवर श्वापदे, साप, विंचू यांच्या सान्निध्यात राहावे लागत आहे. 

लांबाचीवाडी येथे तात्पुरत्या निवासाची सोय आहे. पण, रोजंदारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातच कोरोनामुळे रोजंदारी मिळणे दुरापास्त झाले आहे. रेशनवर मिळणाºया तुटपुंज्या धान्यावर गुजराण करावी लागत आहे. या ग्रामस्थांची पुनर्वसनाची जबाबदारी पुणे जिल्हा प्रशासनाची असल्याने, तसा प्रस्ताव मुरबाडचे वनक्षेत्रपाल विकास भामरे यांनी मंजुरीसाठी पाठवला आहे.  सरकार कधी मंजुरी देते याकडे स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थ यांचे लक्ष लागले आहे.

साकरमाची येथील विस्थापितांचे पुनर्वसन पुणे जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारित येते. तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचे पुनर्वसन रखडले. परंतु, लवकरच त्यांचा प्रश्न सुटेल. - विकास भामरे, वनक्षेत्रपाल, मुरबाड पूर्व