शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाणी साचल्यामुळे रहिवाशी अडकल्याची वर्दी, आपत्ती व्यवस्थापनसह यंत्रणांनी केले बचतकार्य

By जितेंद्र कालेकर | Updated: May 8, 2023 20:15 IST

पोलिसांनी राबविले मॉकड्रील, महावितरणसह अग्निशमन दलाचाही सहभाग

ठाणे: राबोडी भागात नाल्याला पूर आल्यामुळे मोठया प्रमाणात पाणी साचून रहिवाशी अडकल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागासह ठाण्यातील अग्निशमन दल तसेच पोलिस यंत्रणेलाही मिळाली. ही माहिती मिळताच तातडीने या सर्व यंत्रणांनी संबंधित ठिकाणी धाव या रहिवाशांची सुटका केली. पावसाळयात जर अशी आपत्ती ओढवलीच तर यंत्रणा किती सतर्क आहेत, याची चाचपणी करण्यासाठी हे मॉकड्रील ठाणे महापालिकेने सोमवारी दुपारी राबविल्याचे नंतर स्पष्ट झाले. 

राबोडीतील आनंद पार्क येथील आशियाना बंगल्यसमोरील नाला टूथडी भरुन वाहत असल्याची माहिती ८ मे रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास  आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये राबोडी पोलिसांनी दिली. जवळच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे रहिवाशी अडकल्याचेही सांगण्यात आले. त्यानुसार घटनास्थळी राबोडी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, अग्निशमन दलाचे जवान हे रेस्क्यु वाहनासह तसेच राष्ट्रीय महामार्ग कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी आणि  ठाणे नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी,१०८-रुग्णवाहिका त्याचबरोबर ठाणे महापालिकेच्या उथळसर प्रभाग समितीचे कर्मचारी आणि  कॉज फाउंडेशनचे (महिला व बालसुरक्षा संस्था) कर्मचारी घटनास्थळी अवघ्या काही वेळातच दाखल झाले.

त्यानंतर अशीच एखादी आपत्ती ओढवली तर यंत्रणा किती सतर्क आहेत, याची चाचपणी करण्यासाठी हे मॉकड्रील घेतल्याचे यावेळी  राबोडी पोलिसांनी सांगितले. यात सर्व यंत्रणा यशस्वी झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दिली. खिडकाळीमध्येही आपत्ती विभागाची परीक्षा!दरम्यान, अशाच प्रकारचे मॉकड्रील सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास डायघर पोलिसांनी रिव्हर वूड पार्क, देसाई नाका, कल्याण - शिळफाटा रोड, खिडकाळी या भागात घेतले. ठाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने इमारत क्रमांक ३५ मध्ये काही व्यक्ती अडकल्याची माहिती देण्यात आली होती. याठिकाणीही अग्निशमन दल, डायघर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान,  दिवा प्रभाग समितीचे पथक, टोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी आदींनी धाव घेत हे मॉक ड्रीलही सायंकाळी ६.४० वाजण्याच्या सुमारास यशस्वी केले.

 

टॅग्स :thaneठाणे