शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ईफेड्रिन प्रकरण : आरोपींच्या नातेवाइकांचा न्यायाधीशांवर दबाव, न्यायाधीशांचा सुनावणीस नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 05:25 IST

ममता कुलकर्णी व तिचा पती विकी गोस्वामी आरोपी असलेल्या ईफेड्रिन ड्रग प्रकरणी आरोपी मनोज जैन याच्या जामिनासाठी त्याच्या नातेवाइकांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे घर गाठून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

मुंबई : ममता कुलकर्णी व तिचा पती विकी गोस्वामी आरोपी असलेल्या ईफेड्रिन ड्रग प्रकरणी आरोपी मनोज जैन याच्या जामिनासाठी त्याच्या नातेवाइकांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे घर गाठून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.न्या. रेवती डेरे-मोहिते यांनी मंगळवारी न्यायालयाचे कामकाज सुरू असताना विशेष सरकारी वकिलांना ही बाब सांगितली. त्याबाबत नाराजी व्यक्त करत, जामीन अर्जावरील सुनावणी आपण घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.अ‍ॅव्हॉन लाइफ सायन्स या कंपनीवर पोलिसांनी छापा टाकून सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे ईफेड्रिन जप्त केले. कंपनीचा मालक मनोज जैन, व्यवस्थापक राजेंद्र डिमरी व युनियन लीडर बाबा धोत्रे यांना अटक केली. ठाणे विशेष एनडीपीएस न्यायालयाने या सर्वांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला. न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर या जामीन अर्जावर सुनावणी होती. न्यायाधीशांनी या प्रकरणात अ‍ॅड. अयाज खान आरोपींच्या बाजूने लढणार आहेत का, असा प्रश्न केला. त्यावर अ‍ॅड. हिरये यांनी ‘हो’ म्हटल्यावर, न्यायाधीशांनी आपण प्रकरणावर सुनावणी घेऊ शकत नाही, असे सांगितले.आरोपींचे नातेवाईक माझ्या घरी आले. त्यांनी माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आरोपींचे नातेवाईक आणि मी एकाच परिसरात राहतो, असे न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी सांगितले. संबंधित प्रकारामुळे अर्जावर सुनावणी घेऊ शकत नाही, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले.न्या. रेवती डेरे-मोहिते यांनी भर कोर्टात असे सांगून, नागरिकांचा न्यायसंस्थेवरील विश्वास अधिक दृढ केला आहे, असे विशेष सरकारी वकील हिरये यांनी सांगितले.ममता कुलकर्णी व तिचा पती विकी गोस्वामी यांच्यावर भारताबाहेरून देशात ड्रग विकत असल्याचा आरोप आहे. विकी गोस्वामीने ईफेड्रिन हे अ‍ॅव्हॉन लाइफ सायन्स कंपनीकडे देत त्यानंतर त्याची विक्री केल्याचा तपासयंत्रणेचा दावा आहे.