शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांमध्ये खरेदीचा उत्साह, बाजारपेठेत वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 03:09 IST

गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू झालेला दिवाळीच्या खरेदीचा उत्साह या आठवडाअखेरीस शिगेला पोहोचला होता. दिवाळीची लगबग १५ दिवसांपासून सुरू होती. या दोन दिवसांचा मुहूर्त साधत चाकरमान्यांनी उरलीसुरली सर्व खरेदी एकदाची उरकून घेतली.

ठाणे - गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू झालेला दिवाळीच्या खरेदीचा उत्साह या आठवडाअखेरीस शिगेला पोहोचला होता. दिवाळीची लगबग १५ दिवसांपासून सुरू होती. या दोन दिवसांचा मुहूर्त साधत चाकरमान्यांनी उरलीसुरली सर्व खरेदी एकदाची उरकून घेतली. बाजारपेठेत गर्दीचा महापूर आणि मोठी वाहतूककोंडी होती; पण तरीही सणाचा उत्साह ठाणेकरांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.नवरात्रीनंतर लगेचच सुरुवात झाली, ती दिवाळीच्या तयारीला. सर्वात आधी बाजारपेठा सजल्या, त्या रंगीबेरंगी आकाशकंदील, विविध प्रकारच्या पणत्या, रंगीबेरंगी रांगोळ्या, चवदार फराळांनी आणि फटाक्यांनी; दुसरीकडे सुरुवात झाली, ती घरातील साफसफाईला. घरात अडगळ ठरणाºया वस्तू टाकून देऊन घर टापटीप ठेवण्याकडे गृहिणींचा कटाक्ष होता. कंदील, पणती, रांगोळ्यांची खरेदी करणे, फराळाच्या आॅर्डर्स देणे, याची घराघरांत लगबग सुरू होती. घर रंगवण्यापासून घर स्वच्छ ठेवण्यापर्यंत सगळ्यांचीच जय्यत तयारी सुरू होती. नवीन कपड्यांची खरेदीही सुरू होती. सुटी मिळेल, तशी घरातील मंडळी कपडेखरेदीसाठी जात होती. साड्या, ड्रेस, शर्ट-पॅण्ट, धोतर, पारंपरिक पोशाख अशी प्रत्येकाच्या निवडीनुसार खरेदी सुरू होती. बाजारपेठांप्रमाणेच मॉल्समध्येही तोबा गर्दी होती.रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरूचफराळाच्या कच्च्या मालासाठी धान्य भांडार, किराणा माल, जनरल स्टोअर्स सगळीकडे तुफान गर्दी होती. प्रत्येक रविवार छोट्या दुकानांपासून मोठ्या दुकानांपर्यंत गर्दीचा होता. त्यामुळे दुकानदारांनी कामगारांच्या सुट्या रद्द केल्या होत्या.रात्री १० वाजता बंद होणारी दुकाने ही दिवाळीच्या काही दिवस आधी उशिरापर्यंत सुरू ठेवली होती. रस्त्याच्या कडेला ग्रामीण भागातून आलेले विक्रेते बसले होते. स्टेशन रोडपासून जांभळीनाक्यापर्यंतचा संपूर्ण रस्ता गर्दीने फुलला होता.

टॅग्स :Diwaliदिवाळीthaneठाणे