शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

इव्हेंट, प्रसिद्धीपेक्षा साधनेतून कलेचा आनंद घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:57 IST

वयाच्या चाळिशीच्या आत आजच्या नवोदित कलाकारांना झटपट नाव, पैसा, प्रसिद्धी मिळते. मात्र, हे सर्व मिळणे म्हणजे एक प्रकारचा धोका आहे

ठाणे : वयाच्या चाळिशीच्या आत आजच्या नवोदित कलाकारांना झटपट नाव, पैसा, प्रसिद्धी मिळते. मात्र, हे सर्व मिळणे म्हणजे एक प्रकारचा धोका आहे. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात काहीतरी ध्येय ठेवावे. इव्हेंट आणि प्रसिद्धीच्या मागे न पळता आपल्याला स्वत:ला निखळ आनंद मिळेल, इतकी साधना करावी आणि सतत नवीन शिकत राहावे, असा सल्ला प्रसिद्ध गायिका आशा खाडिलकर यांनी दिला.सरस्वती शाळेच्या पटांगणात सुरू असलेल्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत रविवारी आशा खाडिलकर यांची मुलाखत रंगली. गेले सात दिवस सुरू असलेल्या या व्याख्यानमालेचा सुरेल समारोप झाला. कीर्ती आगाशे यांनी त्यांना बोलते केले. वयाच्या तेराव्या वर्षी पहिल्या संगीत मैफलीत मी गायले. त्यात प्रथम क्रमांक आला. त्यानंतर, संगीत क्षेत्रात जी भरारी घेतली, त्याचे श्रेय माझे सर्व गुरू आणि आईवडील, त्यांचे संस्कार, दिग्गजांचा आशीर्वाद आणि रसिकांची दाद याचे आहे. दहावी इयत्तेत शिकत असताना स्पर्धेत पहिल्या क्र मांकाने विजयी ठरल्यावर भीमसेन जोशी यांनी दिलेला मोलाचा सल्ला आणि हिराबाई बडोदेकर यांनी दिलेली तानपुºयाची भेट माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. अभिषेकी बुवांना कधी गाण्यांना चाली शोधत बसावे लागले नाही. हल्ली संगीतकारांना चाली शोधत बसाव्या लागतात. कधी कधी पंचवीसएक चाली लावतात, असा अनुभवही त्यांनी सांगितला.हल्ली टीव्ही चालू केला की, त्यावर आपल्याला ठरावीक तीच गाणी, तीच नृत्ये पाहायला मिळतात. टाळ्या कशाला मिळतात, हे माहीत झाल्यावर तेचतेच लोकांसमोर आणले जाते. रसिकांना नवीन काही द्यावं हे गायकांनाही वाटत नाही. मात्र, कलावंतांनी असे करू नये. नवीन शिकावं, रसिकांसमोर नवनवीन कला सादर करावी, प्रयोगशील असावे, असा संदेश खाडिलकर यांनी दिला. नरवर कृष्णा समान, विलोपले मधुमिलनात या... अशी गाणी सादर करत त्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. तर, अमृताहूनी गोड... या भक्तिगीताने मुलाखतीचा सुरेल समारोप झाला. या वेळी आमदार संजय केळकर, समितीचे शरद पुरोहित उपस्थित होते.