शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदरच्या ‘नव ठाणेकरां’ची इंग्रजी पुस्तकांना पसंती, वाचकांमध्ये ५०० ग्रंथांची झाली देवाण घेवाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:40 IST

घोडबंदर रोड या नव ठाणेकरांच्या कॉस्मोपॉलिटन पट्ट्यात १ व २ आॅक्टोबर रोजी आयोजित केलेल्या ‘आवडलेले पुस्तक मोफत घ्या’ या उपक्रमाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ठाणे : घोडबंदर रोड या नव ठाणेकरांच्या कॉस्मोपॉलिटन पट्ट्यात १ व २ आॅक्टोबर रोजी आयोजित केलेल्या ‘आवडलेले पुस्तक मोफत घ्या’ या उपक्रमाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल ३०० वाचकांनी भेट देऊन ५०० पुस्तकांची देवाण-घेवाण केली. अर्थात या ठिकाणी मुख्यत्वे इंग्रजी पुस्तकांना वाचकांची पसंती होती.मे महिन्यात जुन्या ठाण्यात राबवण्यात आलेल्या या उपक्रमात वाचकांनी मराठी पुस्तकांना पसंती दिली होती. घोडबंदर परिसरातील वाचकांचा मात्र इंग्रजी पुस्तकांकडे ओढा होता. अनेक अमराठी वाचकांनीही मेळाव्यास भेट दिली.‘पुस्तक घ्यावे, पुस्तक द्यावे, अखंड वाचीत जावे...’ या संकल्पनेवर आधारीत हा उपक्रम रविवार आणि सोमवारी ऋतूू एन्क्लेव्ह सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळील बाग, घोडबंदर रोड, ठाणे येथे राबविण्यात आला. मराठी, अमराठी ३०० वाचकांनी येथे भेट देऊन तब्बल ५०० पुस्तकांची देवाण घेवाण केली. या उपक्रमात मराठी, इंग्रजी, बालसाहित्य स्वीकारले जाणार असल्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार वाचकांनी पुस्तके आणली होती. घोडबंदरवासियांनी मराठी पुस्तके दिली आणि वाचायला इंग्रजी पुस्तके घेतली. या मेळाव्यात लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंतचे सर्व वाचक सहभागी झाले होते. फिक्शनकडे वाचकांचा अधिक ओढा असल्याचे कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेचे विश्वस्त विनायक रानडे यांनी सांगितले.रानडे यांच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या वाचन चळवळीचा विस्तार भारत आणि त्याबाहेर झाला आहे. वाचनालयापासून दूर गेलेल्या वाचकाला पुस्तकाच्या जवळ आणण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘आवडलेले पुस्तक मोफत घ्या’ हा उपक्रम. प्रत्येक वाचकाकडे किमान पाच ते सहा पुस्तके असतातच. ती वाचून झाल्यावर काय करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो अशा वाचकांना डोळ््यासमोर ठेवून रानडे यांनी पुस्तकाच्या देवाण घेवाणचा उपक्रम सुरू केला. नाशिकमध्ये प्रथम हा उपक्रम सुरू झाला. त्यानंतर महाराष्ट्रातील २२ ठिकाणी हा उपक्रम राबविला गेला.त्याला ११ हजार ५०० वाचकांनी भेट दिली तर २१ हजार पुस्तकांची देवाण घेवाण झाली. मे महिन्यात ठाण्यात प्रथमच हा उपक्रम राबविला गेला आणि दोन दिवसांत तब्बल दोन हजारांहून अधिक पुस्तकांची देवाण घेवाण झाली.पाचशेहून अधिक वाचकांनी भेट दिली. यात इंग्रजी पुस्तकांना तरुणांचा तर ज्येष्ठ नागरिकांचा आध्यात्मिक, कथा - कादंबºयांना अधिक प्रतिसाद लाभला. महिलांनी आध्यात्मिक पुस्तके अधिक दिली. परंतु, घेताना विविध प्रकारांची पुस्तके घेतली होती.

टॅग्स :thaneठाणे