शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये १६ दिवसांमध्ये कोविड सेंटर उभारणारे अभियंता भूषण हर्षे ठाण्यात रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:45 IST

ठाणे: औरंगाबादमध्ये अवघ्या १६ दिवसांमध्ये ३०० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारणारे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे हे आता ठाण्यात बदलीने ...

ठाणे: औरंगाबादमध्ये अवघ्या १६ दिवसांमध्ये ३०० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारणारे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे हे आता ठाण्यात बदलीने रुजू झाले आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ठाणे विभाग क्रमांक एकच्या कार्यकारी अभियंतापदी त्यांची राज्य शासनाने नुकतीच नियुक्ती केली आहे.

सरळ सेवा पद्धतीने जुलै २०१५ मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळात त्यांची नियुक्ती झाली. महामंडळाच्या लातूर विभागात २०१५च्या दुष्काळी परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने उद्योगांचा पाणी पुरवठा सुस्थितीत ठेवण्यासाठी ते प्रयत्नशील होते. जून २०१६ ते २०१८ यादरम्यान धुळे विभागांतर्गत जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील उद्योग विकासासाठी तसेच पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. पुढे २०१८ ते जुलै २०२१पर्यंत ते औरंगाबाद येथे कार्यरत होते. याच काळात औरंगाबाद येथे नवीन ७२ दशलक्ष घनमीटर इतकी प्रतिदिन पाणी पुरवठा योजना त्यांनी कार्यान्वित केली. याशिवाय, ३१ मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचे अघातक कचरा संकलन, उपचार विल्हेवाट आणि व्यवस्थापन सयंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. कोविड काळात महामंडळातर्फे ५० टक्के ऑक्सिजनची व्यवस्था असलेले ३०० खाटांचे सुसज्ज असे कोविड केअर सेंटर वैद्यकीय उपकरणांसह तयार करून त्यांनी ते महापालिकेला सुपूर्द केले. अल्पावधीत रुग्णालयाची उभारणी केल्याबद्दल उद्योगमंत्री देसाई यांनीही त्यांचे विशेष कौतुक केले होते. ठाणे विभागातील वागळे इस्टेट, तारापूर आणि अंधेरीचे कार्यक्षेत्र त्यांच्याकडे असून, अंधेरीतील एसआरए प्रकल्प काही दिवसांमध्ये मार्गी लावण्याचा मनोदय त्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला.

...........................