लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : प्रवासभत्ता न मिळाल्याने आपल्याच कार्यालयात चोरी करणाऱ्या किर्ती दास या अभियंत्याला ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायाालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दास हा शांती हाइट्स येथील मॅन पॉवर मॅनेजमेंटच्या कार्यालयात अभियंता होता. आपल्या मालकाने प्रवास भत्ता न दिल्याच्या कारणामुळे त्याने ७ ते १० एप्रिल २०१७ या काळात कार्यालयाची चावी घेऊन लेटरहेड तसेच संगणक साहित्यासह अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरी केली. याप्रकरणी लामोटील धोराईस्वामी यांनी ९ मे रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
अभियंत्याला अटक
By admin | Updated: May 13, 2017 00:53 IST