शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
3
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
4
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
5
चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!
6
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
7
“सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’”; आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
8
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
9
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
10
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!
11
हृदयद्रावक! एका पायलटच्या लग्नासाठी कुटुंबीय शोधत होते मुलगी तर दुसऱ्याला १ महिन्याचा मुलगा
12
१.१० रुपयांवरून वर्षभरात ८,३८५% वाढून ९३,९४ वर पोहोचला हा शेअर; आजही लागलं अपर सर्किट
13
चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा
14
Life Lesson: तुम्हाला अतिविचार करण्याची सवय आहे? मग 'हा' गुरुमंत्र येईल कामी!
15
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?
16
आयपीएलमध्ये तिकीट घोटाळा, सीआयडीची मोठी कारवाई, हैदराबाद क्रिकेट संघटेनेच्या अध्यक्षांना अटक   
17
'पालिका प्लॅन' ON ! सांगली, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
18
दे दणादण! काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; माजी आमदार जखमी
19
Glen Industries IPO च्या GMP मध्ये तुफान तेजी; आतापर्यंत ४३ पट झाला सबक्राइब, पाहा डिटेल्स
20
Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेला सायंकाळी 'हा' उपाय करा; अडलेली कामे मार्गी लागतील!

कळव्यातील संथ मतमोजणीने पाहिला अंत

By admin | Updated: February 24, 2017 07:30 IST

मतदानाच्या दिवशी ठिकठिकाणच्या केंद्रांवर जसा याद्यांचा घोळ पाहण्यास मिळाला, त्याचप्रमाणे

ठाणे : मतदानाच्या दिवशी ठिकठिकाणच्या केंद्रांवर जसा याद्यांचा घोळ पाहण्यास मिळाला, त्याचप्रमाणे कळव्यात मतमोजणी प्रक्रियेवेळीही गोंधळ पाहण्यास मिळाला. ही प्रक्रिया अगदी धीम्या गतीने सुरू होती. तेथे पहिला निकाल जाहीर होण्यासच तीन तास लागले. त्यामुळे दुसऱ्या प्रभागातील उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना पहिली प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ताटकळत रहावे लागले. कळव्यातून शिवसेनेच्या नऊ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा आणि एका अपक्षाच्या पारड्यात मते टाकण्यात आली. कळव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या चुरशीच्या लढतीत शिवसेनेने बाजी मारल्याची दिसली. तर, भाजपाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. प्रत्येक प्रभागातील नागरिकांनी टपाल असो किंवा प्रत्यक्ष मतदान असो, त्यात केलेला नोटाचा वापर लक्षणीय ठरला. कळव्यातील ९, २३, २४, २५ या प्रभागांतील मतमोजणी कळव्यातील सरकार विद्यामंदिर येथे पार पडली. तेथे १७ टेबले लावली होती. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती. पण, ती तिला सव्वा ते साडेदहा वाजले. सुरुवातीला टपाली मते मोजली. या वेळी मतदारांनी नोटाला कळ दिली. त्यानंतर, व्होटिंग मशीन उघडण्यात आल्या. ९ नंबरच्या प्रभागातून शिवसेनेचे चारही उमेदवार निवडून आले. यात प्रभाग क्रमांक-९ ब मधील शिवसेनेच्या अनिता गौरी व राष्ट्रवादीच्या सुरेखा पाटील यांच्यात चुरस झाली. तीन फेऱ्यांत अनिता गौरी यांनी पाटील यांना मागे टाकून विजय संपादन केला. त्यानंतर, झालेल्या २३ प्रभाग क्रमांकमधील राष्ट्रवादीचे चारही उमेदवार पहिल्यापासून आघाडीवर राहून ते पॅनलही विजयी झाले. प्रभाग २४ मध्ये दोन शिवसेना, प्रत्येकी एक राष्ट्रवादीचे आणि अपक्ष उमेदवार निवडून आले. प्रभाग २५ अ आणि ब मध्ये शिवसेनेचे गणेश साळवी आणि राष्ट्रवादीच्या महेश साळवी तर शिवसेनेच्या मंगल कळंबे आणि राष्ट्रवादीच्या मनाली पाटील यांच्यात झालेल्या चुरशीत महेश साळवी तर मंगल कळंबे यांनी बाजी मारून गेले. असे राष्ट्रवादी तीन तर शिवसेनेचे एक जण निवडून आले आहेत.या प्रभागांची मतमोजमी सुरू झाल्यापासून दरवेळी चित्र बदलत जाताना गर्दीचा माहोलही बदलत होता. क्षणोक्षणी उत्कंठा वाढत होती. (प्रतिनिधी)