शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मार्चअखेर ५० विविध ठिकाणी 'आपला दवाखाना' उभा राहणार; सामान्यांना होणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 01:34 IST

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार आपला दवाखाना हे क्लिनिक ठाण्यात सुरू झाले

ठाणे : गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ‘आपला दवाखाना’ ही संकल्पना ठाण्यात रुजवली. काही नगरसेवकांनी या संकल्पनेला विरोध केला असला तरी येत्या मार्चपर्यंत सामान्यांसाठी ५० आपला दवाखाना सुरू करण्याचे प्रयत्न झाले आहेत. येत्या फेब्रुवारीपर्यंत २५ वे क्लिनिक सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही आपला दवाखाना आणि वन रुपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले यांनी सांगितले. तर ज्या नगरसेवकांना आपल्या प्रभागात अशाप्रकारे आपला दवाखाना सुरू करायचा असेल त्यांना महापालिका आयुक्तांशी पत्रव्यवहार करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार आपला दवाखाना हे क्लिनिक ठाण्यात सुरू झाले. दीड महिन्यापासून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ठाण्यात ५० क्लिनिक सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यातील अवघे पाच क्लिनिक दीड वर्षात सुरू झाले होते. त्यामुळे यावरून टीका सुरू होती. 

आता आपला दवाखाना याचा कारभार मॅजिक दिल या संस्थेच्या वन रुपी क्लिनिकने हाती घेतला आहे. कमी वेळेत क्लिनिक सुरू केल्याने संख्या पाचवरून आठवर गेली आहे. तसेच येत्या ४ फेब्रुवारीला २५ वे क्लिनिक सुरू करण्याचे नियोजन केले आहे. सध्या ठाणे शहरातील कोपरी, राबोडी, लोकमान्यनगर, सावरकरनगर, किसननगर आदी ठिकाणी क्लिनिक सुरू असून लवकरच मुंब्रा येते तीन, कळव्यात दोन, दिवा येथे चार  ठिकाणी हे दवाखाने सुरू होतील. त्याचा लाभ सामान्यांना होईल, अशी माहिती  सूत्रांनी दिली.

महापालिकेने ठाण्यात ५० आपला दवाखाना सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यानुसार येत्या ४ फेब्रुवारीला २५ वे क्लिनिक सुरू करण्याचे नियोजन केले आहे. उर्वरित मार्च अखेरपर्यंत सुरू होतील. जर नगरसेवकांना आपल्या प्रभागात क्लीनिक सुरू व्हावे असे वाटत असेल तर त्यांनी आयुक्तांकडे मागणी करावी. - डॉ. राजू मुरुडकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, ठामपा.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल