शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

चौदा पार्किंगवर अतिक्रमण

By admin | Updated: October 28, 2015 23:23 IST

ठाणे शहरात वाहनांची संख्या १६ लाखांवर पोहोचलीे. मात्र, पुरेसे पार्किंग नाही. त्यासाठी आरक्षित १४ भूखंड अतिक्रमणांनी गिळंकृत केले आहेत.

घोडबंदर : ठाणे शहरात वाहनांची संख्या १६ लाखांवर पोहोचलीे. मात्र, पुरेसे पार्किंग नाही. त्यासाठी आरक्षित १४ भूखंड अतिक्रमणांनी गिळंकृत केले आहेत. काही विकासकांनी १० टक्के राखीव असलेली व्हिजिटर पार्किंगची जागा हडप केल्याने नागरिकांना आपली वाहने रस्त्यावर पार्क करावी लागतात. त्यामुळे वाहनमालक-चालक या समस्येला वैतागले असून ‘काहीतरी कर ठाणेकर’ या मोहिमेंतर्गत आता ठाणेकरांनी याविरोधात येण्याची गरज आहे. काही आरक्षणे ही राजकीय वरदहस्तामुळे पालिकेच्या ताब्यातून गेली आहेत. कोपरी, आनंदनगर या भागात बसस्थानकाजवळ रेल्वेच्या जागेत ०.१४ हेक्टरची जागा पार्किंगसाठी आरक्षित आहे. मात्र, तेथे रेल्वेने अतिक्र मण केले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण इमारतीच्या पूर्वेस कोपरीत गट नं. ८६ मध्ये ०.४० हे पार्किंगचे क्षेत्र मिठागराने बाधित आहे. आनंदनगर रेल्वेलाइनलगत मध्य रेल्वेच्या ०.४८ हेक्टर जागेवर ७० टक्के अनधिकृत बांधकामे झाली आहेत. सेक्टर २ मधील ठाणे शहर आणि पाचपाखाडी भागात सिटी सर्व्हे नं. २९५ पैकी ०.२० हेक्टर खाजगी जागा जव्हारबागेसमोर असून त्या ठिकाणी ३४ अनधिकृत बांधकामे उभी आहेत.अंतिम भूखंड २४६ मध्ये ०.०८१ या जागेत ओपन स्पेस आणि पार्किंगचे आरक्षण आहे. त्या ठिकाणी निवासी आणि वाणिज्य बांधकामे झाली आहेत. सर्व्हे नं. १२३ पैकी ०.१९ व सर्व्हे २२० पैकी ०.११ माजिवडे येथे आहे. मेंटल हॉस्पिटल सर्व्हे नं. १४१ मधील ०.४१ हेक्टर ही जागा झोपडपट्टी व नाल्यामुळे बाधित आहे. सर्व्हे १४२ मधील ०.२७ हेक्टर जागा मोकळी आहे. सर्व्हे ४६४, ४६५ अ, ४६६ या सर्व्हेमधील १.७२ हेक्टर जागा मॉडेला कंपनीच्या आवारात आहे. अंतिम भूखंड ५१ मध्ये ०.१५ आणि ०.०७ हेक्टर जागेवर अतिक्र मणे आहेत.कळवा, खारेगावमध्येही अतिक्रमणकळव्यातही सर्व्हे १०१७ पैकी ०.०२ च्या पार्किंग आरक्षित जागेवर सरस्वती अपार्टमेंट ही दोन मजली इमारत उभी आहे. सर्व्हे नं ४०० मध्ये ०.४३ हेक्टर आरक्षित जागेत रेल्वेची इमारत आहे. खारेगाव पारसिकमध्ये सर्व्हे १३९, १४०, १४१ पैकी जागेत ०.९४ हेक्टर पार्किंगची जागा मोकळी आहे. सर्व्हे नं. १२६ आणि १२८ पैकी जागेत ०.२२ हेक्टर पार्किंगच्या जागेत स्वामी समर्थ मंदिर आहे. खारेगावमध्ये खारभूमीच्या जागेवर ६.४८ हेक्टर इतकी जागा ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित आहे. या सर्व भूखंडांवर सोय केल्यास पार्किंगची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.खारटन रोड येथील खाडीकिनारी १.६० हेक्टर जागा वाहनांच्या पार्किंगसाठी आरक्षित असली तरी त्या ठिकाणी नागसेननगर उभे राहून १८८६ झोपड्या आहेत. नौपाडा पोलीस स्टेशनसमोर सर्व्हे नं. २० अ ही खाजगी जागा आरक्षित असून सध्या ती लादी कारखानदाराच्या ताब्यात आहे.