शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील केबी रस्त्यावरील वाहनांवर अतिक्रमण विभागाची कारवाई

By सदानंद नाईक | Updated: November 23, 2022 18:16 IST

चार चाकी व दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली.

उल्हासनगर : शहरातील कल्याण ते बदलापूर मुख्य रस्त्यावर धोकादायक स्वरूपात उभे केलेल्या वाहनावर महापालिका अतिक्रमण विभागाने कारवाई केली. चार चाकी व दुचाकी वाहनांवर कारवाई करून पन्नास हजाराचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.

उल्हासनगरातील बहुतांश रस्ते अरुंद असल्याने, वाहतूक कोंडीची समस्या शहरात आहे. शहरातून जाणारा कल्याण ते बदलापूर रस्त्याचे १०० फुटाचे रुंदीकरण झाले. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला अवैधपणे चार चाकी व दुचाकी गाड्या पार्किंग केल्या जातात. या वाहनांचा अवैध पार्किंगमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी अतिक्रमण विभागाला आदेश देऊन अश्या गाड्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. सहायक आयुक्त व अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली अवैधपणे पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई केली. तसेच एकाच दिवसात ५० हजाराचा दंड वसूल केला. यानंतर अवैधपणे पार्किंग केलेल्या वाहनावर कारवाई करण्याचे संकेत शिंपी यांनी दिली. तर दुसरीकडे कोणतेही सूचना न देता गाड्यावर कारवाई केल्याचा निषेध व्यापाऱ्यांनी केला. 

शहरातील रस्त्यावर धोकादायक स्थितीत वाहने उभ्या करणाऱ्यांवर पोलिसांनीही दंडुक उगारला आहे. गेल्या आठवड्यात विविध पोलीस ठाण्यात रस्त्यावर धोकादायक स्थितीत लावलेल्या गाड्या चालकांवर गुन्हे दाखल झाले. चौक, मुख्य रस्ते, गर्दीचे ठिकाण, मार्केट आदी ठिकाणी अवैधपणे पार्किंग केलेल्या वाहनावर कारवाईचे संकेत महापालिका अतिक्रमण विभागाणे दिल्याने, व्यापारी व नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर