शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत मराठी भाषा येणारे कर्मचारी नेमावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 23:19 IST

एकीकरण समितीचा ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेने मराठी भाषा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत ठेवण्यासह पालिकेचे नामफलक आणि दुकाने, आस्थापनांवरील फलक मराठीत असावेत, यासाठी मराठी एकीकरण समितीने बुधवारी महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले. कायद्यात तरतूद असूनही पालिका कारवाई करत नसल्याने समितीने संताप व्यक्त केला आहे. 

मराठी राजभाषा आहे. मराठीचा वापर करणे कायद्याने बंधनकारक आहे. असे असताना मात्र सर्रास दुकाने, आस्थापना, हॉटेल आदींवर मराठी भाषेला डावलून अन्य भाषेत नामफलक लावलेले आहेत. परंतु, त्यांच्यावर पालिका काहीच कारवाई करत नाही. इतकेच काय तर महापालिकेनेही काही मराठीद्वेष्टे नगरसेवक, नेत्यांसाठी विविध चौक, रस्त्यांना आणि वास्तूंना चक्क अमराठी भाषेतील नामफलक लावलेले आहेत, असा आरोप समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केला आहे. 

महापालिका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. परंतु, भरती करताना मराठी लिहिता, बोलता, समजता व वाचता न येणाऱ्या अनेकांना नेमले जात आहे. राजभाषा न येणाऱ्यांना पालिका सेवेत घेण्याऐवजी मराठी तरुणांना संधी द्या. पालिकेच्या आरक्षित जागेत मराठी भाषा भवन तयार करा, अशी मागणी समितीचे सचिन घरत यांनी केली आहे.    मराठी एकीकरण समितीकडून सातत्याने मागण्या केल्या जात आहेत. याबाबत तत्कालीन आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी पालिका अधिकाऱ्यांसह एकीकरण समितीच्या सदस्यांची बैठक घेऊन कार्यवाहीचे आश्वासन दिले होते.  परंतु, पालिका अधिकाऱ्यांनी कारवाईच केली नाही. राजभाषेचा अवमान थांबवून जर सन्मान केला जात नसेल, तर त्यासाठी आंदोलने करणारच. आयुक्त व अन्य पदाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन ही तर सुरुवात आहे, असा इशारा घरत यांनी दिला. 

मराठीचा वापर हा बंधनकारकआयुक्त दिलीप ढोले यांनी समितीच्या सदस्यांची भेट घेऊन आपण नुकताच आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला असून सविस्तर चर्चा करून कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. मराठी राजभाषेचा वापर  हा बंधनकारक असल्याने त्यात कोणतीही कसूर खपवून घेणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेmarathiमराठी