शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

बांधकाम खात्यात एका अधिकाऱ्याची भर

By admin | Updated: June 29, 2015 03:58 IST

खोपोली पालिकेच्या विविध विकासकामांसाठी नगरविकास खात्याने बांधकाम खात्यात आणखी एक अधिकारी पाठवून या शहराच्या विकासासाठी जणू वाटेकरी पाठविला आहे, अशी चर्चा सर्वत्र आहे.

वावोशी : खोपोली पालिकेच्या विविध विकासकामांसाठी नगरविकास खात्याने बांधकाम खात्यात आणखी एक अधिकारी पाठवून या शहराच्या विकासासाठी जणू वाटेकरी पाठविला आहे, अशी चर्चा सर्वत्र आहे. नगराध्यक्ष दत्ता मसूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत राज्य शासनाचा निर्णय मुख्याधिकारी डॉ. दीपक सावंत यांनी वाचून दाखविला. तेव्हा सभागृहात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी चर्चेत भाग घेताना विरोध दर्शविला तर काहींनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले.पालिकेत मुख्य अभियंता व दोन सहाय्यक अभियंता ही पदे कार्यरत असताना मुख्य अभियंता या पदासाठी राज्य शासनाने दीपक जाधव यांची पुन्हा नियुक्ती करून पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधीसमोर पेच निर्माण केला आहे. दीपक जाधव यापूर्वी मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. ते केडरमध्ये गेल्याने त्यांची पालघर, जि. ठाणे या ठिकाणी बदली झाली. त्यानंतर जाधव यांनी विशेष प्रयत्न करून आपली केडरमधून मुक्तता केली. त्यानंतर राज्य शासनाने त्यांची मूळ पदावर पुन्हा नियुक्ती करावी, असा आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिला.खोपोली पालिकेत महत्त्वाचे पत्रव्यवहार या विषयाच्या चर्चेदरम्यान जेव्हा मुख्याधिकारी सावंत यांनी या आदेशाचे वाचन केले तेव्हा सभागृहात काही वेळ चर्चा रंगली. काही सदस्यांनी जाधव यांनीच तत्कालीन मुख्याधिकारी नयन ससाणे यांच्यावर न्यायालयात केस दाखल केल्या, त्या केसेस काढून घ्याव्यात असा आग्रह धरला होती. अखेर मुख्याधिकारी सावंत यांनी जाधव यांना समज दिली जाईल, असे सांगितल्यानंतर त्यांच्या नियुक्तीबाबतच्या चर्चेला विराम मिळाला. (वार्ताहर)