शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

निळकंठ आणि रेप्टॉकॉसच्या जागेवर स्मशानभुमी होणार नाही, स्मशानभुमीच्या वादावर अखेर पडला पडदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 16:21 IST

स्मशानभुमीच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. आता रामबाग आणि निसर्ग उद्यानच्या मागील जागेत स्मशानभुमी उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच या स्मशानभुमीच्या मुद्यावरुन रंगलेल्या शिवसेनेच्या दोन नेत्यांमधील वादही मिटला आहे.

ठळक मुद्देनिसर्ग उद्यानच्या जागेजवळ होणार स्मशानभुमीरामबाग स्मशानभुमीच करणार विकसित

ठाणे - मागील दिड महिन्यापासून निळकंठ आणि रेप्टॉकॉसच्या स्मशानभुमीच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. गुरुवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निळकंठच्या ऐवजी निसर्ग उद्यानाच्या मागील बाजूचा अ‍ॅमीनीटी प्लॉट, युनिक शांती आणि टीएमटी डेपोच्या मागील जागेचा पर्याय पुढे आला आहे. तर रेप्टॉकॉसच्या ऐवजी रामबागच्या अस्तित्वातील स्मशानभुमीसाठी रस्ता विकसित करण्याबरोबर येथील बाधीतांच्या पुनर्वसनाची हमी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यावेळी दिली. त्यामुळे आता स्मशानभुमीचा वाद अखेर संपुष्टात आला आहे.            ठाणे शहरातील पोखरण रोड नं.१ व पोखरण रोड नं.२ परिसरातील स्मशानभूमी संदर्भात गुरुवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला आमदार प्रताप सरनाईक, सुभाष भोईर, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, मनसेचे शहर अध्यक्ष अविनाश जाधव, स्थानिक नगरसेवक, आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह स्थानिक नागरीकांचे शिष्ठ मंडळ उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेअंती, निळकंठ येथील जागेवर स्मशानभुमी होणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्या ऐवजी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी निसर्ग उद्यानाच्या जवळ असलेल्या १६०० चौरस मीटरच्या सुविधा भुखंडाचा, तसेच युनिक शांती येथील १२०० चौरस मीटरच्या रहिवास क्षेत्राच्या ठिकाणची जागा आणि टीएमटी डेपोजवळील जागा देखील पर्याय म्हणून पुढे ठेवण्यात आली आहे. या पैकी कोणतीही एक जागा लवकर अंतिम झाल्यास त्याठिकाणी स्मशानभुमी उभारली जाईल असे यावेळी आयुक्तांनी स्पष्ट केले. दुसरीकडे वर्तक नगर भागातील रेप्टॉकॉस जागे ऐवजी, रामबाग स्मशानभुमीच विकसित केली जाईल असा विश्वास आयुक्तांनी यावेळी दिला. परंतु येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याचे मत आमदार सरनाईक यांनी व्यक्त केले. परंतु लोकप्रतिनिधींचे सहकार्य असेल तर त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ता जुन पर्यंत का होईना तयार केला जाईल असा ठाम विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. त्यामुळे रेप्टॉकॉसचा प्रस्ताव देखील मागे पडला आहे. एकूणच आता निळकंठ आणि रेप्टॉकॉसच्या जागेवर स्मशानभुमी होणार नसल्याचे या बैठकीत पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

 शहरातील सर्व स्मशानभुमींचा विकास केला जाणारया बैठकीच्या अनुषंगाने शहरातील महत्वाच्या स्मशानभुमींचा विकास केला जावा, त्या अत्याधुनिक प्रदुषण विरहित करण्यात याव्यात यावर देखील एकमत झाले. त्यानुसार मानपाडा, वागळे, कावसेर, डवले, पाणखंडा, ब्लुरुफच्या मागील बाजूस असलेली स्मशानभुमी, पारसिक खारेगाव, दिवा, दातीवली आदींसह शहरातील इतर सर्वच स्मशानभुमींचा विकास केला जाणार आहे.

राजकीय वाद नव्हताच...निळकंठ स्मशानभुमीच्या मुद्यावरुन मागील काही दिवस शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. बिल्डरांशी असलेल्या संबधांमुळेच स्मशानभुमीला विरोध होत असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला होता. तर रहिवाशांचा या स्मशानभुमीला विरोध असल्यानेच मी देखील विरोध केला होता असे मत नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले होते. परंतु गुरुवारी झालेल्या बैठकीत मात्र आमच्यात कोणत्याही प्रकारचा राजकीय वादच नव्हताच अशी स्पष्ट कबुली या दोनही नेत्यांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाShiv Senaशिवसेना