शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

वीज कामगार संघटनांचा फ्रेंचाइजीला विरोध, सोमवारी निदर्शने आणि द्वारसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 05:38 IST

ठाणे येथील मुंब्रा, शीळ व कळवा आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर उपविभाग क्रमांक एक, दोन, तीन आणि मालेगाव ग्रामीण उपविभागासाठी फ्रेंचाइजींची नेमणूक करण्यात आली आहे.

मुंबई : ठाणे येथील मुंब्रा, शीळ व कळवा आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर उपविभाग क्रमांक एक, दोन, तीन आणि मालेगाव ग्रामीण उपविभागासाठी फ्रेंचाइजींची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, यास वीज कंपन्यांत कार्यरत सर्व सघंटनानी विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनकडून देण्यात आली.फेडरेशन व सहकारी पाच संघटनांनी ७ जानेवारी, २०१९ रोजी संप केल्यानंतर मुंब्रा व मालेगाव विभाग खासगी भांडवलदारांना देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने तूर्त स्थगित केला होता. मात्र, सध्याच्या सरकारने हा निर्णय कोणाच्या हितासाठी घेतला आहे, असा सवालही संघटनांनी केला आहे.उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, गुजरातमध्ये व जळगाव, औरंगाबाद आणि नागपूर वितरणात असलेल्या खासगी फ्रेंचाइजी अपयशी ठरल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.दरम्यान, मुंब्रा, शीळ व कळवा या विभागांसाठी टॉरेंट पॉवर, मालेगाव शहरातील उपविभाग क्रमांक एक, दोन व तीन आणि मालेगाव ग्रामीण उपविभागात येणारे भायेगाव, सायनी, दरेगाव, मालदे आणि द्याने या गावांसाठी कोलकाता इलेक्ट्रिक सप्लाय कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांची फ्रेंचाइजी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.>ठाण्यातही विरोधठाणे येथील मंडळाच्या प्रशासकीय कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने व दुपारी एक द्वारसभा घेण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनकडून देण्यात आली.