शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रात एकाच इमारतीत पकडल्या ४३ घरात वीजचोरी; ८ जणांविरोधात गुन्हे नोंदवले

By अनिकेत घमंडी | Updated: September 6, 2023 18:24 IST

सदर ठिकाणी पूर्वी ‘नयना सदन’ नावाने इमारत होती. त्यावेळी २० वीज मीटर त्या इमारतीत होते

डोंबिवली: टोरंट पॉवरच्या दक्षता पथकाने घातलेल्या धाडीत मुंब्रा अमृत नगर येथील एका इमारतीत वीज चोरीच्या ४३ केसेस पकडल्या असून या प्रकरणी ८ जणांविरूध्द मुंब्रा पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. अमृत नगर येथील ‘बाग ए ख्वाजा’ या इमारतीत ही वीज चोरी पकडण्यात आली असून तळमजला ते सहा मजल्यांची ही इमारत आहे. येथील ४३ घरांमध्ये ८ जणांच्या नावाने वीज मीटर दाखवण्यात आले होते.

सदर ठिकाणी पूर्वी ‘नयना सदन’ नावाने इमारत होती. त्यावेळी २० वीज मीटर त्या इमारतीत होते. सदर बिल्डींग नंतर तोडण्यात आली मात्र मीटर वीज कंपनीकडे जमा करण्यात आले नव्हते. विकासक सय्यद शाबी अहमदवली यानी नवीन इमारत बांधताना नयना सदन हे आधीचे इमारतीचे नाव बदलून ‘बाग ए ख्वाजा’ असे नाव करून नवीन वीज मीटरसाठी अर्ज केलेला दाखवण्यात आला. प्रत्यक्षात त्या ठिकाणी आधीचे जुने मीटर लावून टोरंट पॉवरच्या वाहिनीतून थेट जोडणी करून वीज चोरी सुरू होती. तेथे ८ जणांच्या नावावर मीटर दाखवून चोरीची वीज ४३ घऱांमध्ये पुरवली गेली असल्याचे दक्षता पथकाच्या धाडीत निष्पन्न झाले.

या प्रकरणी विद्युत अधिनियम कायदा २००३ च्या अन्वये मुंब्रा पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एकूण १५ लाख ९३ हजाराची वीज चोरी झाली असल्याचे धाडीत उघड झाले. ग्राहकानी चोरून वीज वापरू नये तसेच वीज मीटरमध्ये कोणताही फेरफार करू नये अन्यथा त्यांच्यावर वीज कायद्यानुसार कारवाई केली जाईल असा इशारा टोरंट पॉवर कंपनीने दिला आहे. 

टॅग्स :electricityवीज