शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील ११० जीन्स कारखान्यांचा वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: July 18, 2015 23:54 IST

हरित लवादाच्या आदेशानुसार वालधुनी नदी प्रदूषणाचा ठपका ठेवून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेवरून महावितरणने शहरातील ११० जीन्स कारखान्यांचा वीजपुरवठा,

- सदानंद नाईक, उल्हासनगर हरित लवादाच्या आदेशानुसार वालधुनी नदी प्रदूषणाचा ठपका ठेवून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेवरून महावितरणने शहरातील ११० जीन्स कारखान्यांचा वीजपुरवठा, तर महापालिकेने ३५ कारखान्यांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. या कारवाईने कारखाने बंद पडून हजारो कामगार बेकार झाले असून त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे. उल्हासनगरात देशातील सर्वात मोठा जीन्स उद्योग भरभराटीस आला असून कारखानदारांनी मिळेल त्या जागी कारखाने उभारल्याने सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेकडो कारखाने कारखान्यांतील अ‍ॅसिडयुक्त रंगहीन सांडपाणी उघड्या नाल्यात सोडत आहेत. परिणामी, नागरिकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत असून सर्वाधिक क्षयरोगी कॅम्प नं-५ मधील जीन्स कारखाने परिसरात आहेत. तीनपैकी एक नागरिक खाज, त्वचारोग, उलटी, त्यासंबंधी रोगाला बळी पडला आहे.कारखानदारांनी सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्लांट उभारण्याचे आदेश राज्य प्रदूषण मंडळाने काढले आहेत. जे कारखाने तो उभारणार नाहीत, त्यांना येथून गाशा गुंडाळण्याचे आदेश मंडळाने दिले आहेत. हे कारखाने प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत सोडत असल्याने उल्हास नदीसह वालधुनी नदी प्रदूषित झाली असून त्यांना पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने कल्याण, उल्हासनगर यांच्यासह अंबरनाथ पालिकेला कोट्यवधींचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाने एका जनहित याचिकेवर उल्हास व वालधुनी नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. प्रदूषण मंडळाने पालिका व महावितरणला प्रदूषित जीन्स कारखान्यांची वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, महावितरणचे कार्यकारी अभियंता मनोज त्र्यंबके यांनी सांडपाणी उघड्या नाल्यात सोडणाऱ्या कारखान्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, दोन महिन्यांत ११० कारखान्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. महापालिकेनेही ३५ कारखान्यांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. इतर कारखान्यांनी अवैधपणे विहिरी खोदून त्या पाण्याचा वापर सुरू केला आहे. कॅम्प नं-४ व ५ परिसरातील हजारो कामगार बेकार झाले आहेत. प्रदूषण मंडळाचे नाहरकत आणल्यावरच वीजपुरवठा पूर्ववत करणार असल्याची माहिती त्र्यंबके यांनी दिली.