ठाणे : महावितरणने सुरु केलेल्या आॅनलाइन वीजबील भरणा सुविधेला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. भांडुुप परिमंडळात अवघ्या दोन महिन्यात साडेपाच लाखाहून अधिक वीज ग्राहकांकडून १३१ कोटींची वसुली या माध्यमातून झाली आहे.वीजबिल भरण्यासाठी महावितरणने अनेक पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत. पैकी सर्वाधिक वापर होणारा पर्याय म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून वापरली जाणारी आॅनलाइन विजबिल भरणा सुविधा. धकाधकीच्या व्यस्त जीवनामुुळे अनेकांना वेळेच्या आता वीजबिल भरणे शक्य होत नाही. त्यामुळे वेळ व पैसा वाचविण्याचा चांगला पर्याय या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. ठाणे नागरी परीमंडळात १ लाख ४१ हजार २२१ घरगुती वीज ग्राहकांनी जुलै महिन्यात ३४ कोटी १० लाख तर आॅगस्टमध्ये १ लाख ४४ हजार १८८ घरगुती वीज ग्राहकांनी ३० कोटी ९७ लाख वीजबिलापोटी जमा केले आहेत. तसेच वाशी मंडळातील १ लाख ४६ हजार ६२८ घरगुती वीज ग्राहकांनी जुलै महिन्यात ३५ कोटी ६२ लाख तर आॅगस्टमध्ये १ लाख ३७ हाजर १४५ ग्राहकांनी ३० कोटी ८४ लाख वीजबिलापोटी जमा केले आहेत. सुरवातीला वाणिज्य व औद्योगिक ग्राहकच आॅनलाइन पेमेंट सुविधेचा वापर करत होते. मात्र आता घरगुती वीजग्राहकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत असून दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. (प्रतिनिधी)विभागवीजग्राहकरक्कमठाणे -१२६५३६६.०८ठाणे -२५०४९६११.१३ठाणे - ३२४४६४३.१८वागळे इस्टे८६७९८१०.०४भांडुप४४३४५१३.४२मुलुंड५२७७०२१.२२वाशी८९४९०२६.०६नेरुळ७९२६९१९.६९पनवेल ११५०१४२०.६९
वीजग्राहकांनी भरले १३१ कोटी
By admin | Updated: September 11, 2015 23:20 IST