शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सेवाकरातून शाळांचे वीजबिल भरण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 00:40 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे वीजबिल व्यावसायिक दराने मोठ्या रकमेचे येत असे. यामुळे बहुतांशी शाळांना वीजजोडणी तोडण्याच्या कारवाईला तोंड द्यावे लागले.

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे वीजबिल व्यावसायिक दराने मोठ्या रकमेचे येत असे. यामुळे बहुतांशी शाळांना वीजजोडणी तोडण्याच्या कारवाईला तोंड द्यावे लागले. यावर मात करण्यासाठी व्यावसायिक दराऐवजी शाळांचे वीजबिल ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सेवाकरातून भरल्यास कमी पैसे मोजावे लागतील. या अटकळीस अनुसरून आता संबंधित शाळेच्या ग्रामपंचायतीवर वीजबिल भरण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडून सोपवण्यात आली आहे.शाळांच्या विद्युतपुरवठ्याचे बिल व्यावसायिक दराने महावितरणकडून काढले जात आहे. यामुळे या शाळेचे वीजबिल मोठ्या रकमेचे येत असे. या मोठ्या रकमेचे वीजबिल भरण्यासाठी शाळांकडे मोठी आर्थिक तरतूद नसल्यामुळे बऱ्याचदा ते वेळेवर भरले जात नाही. यामुळे काही महिन्यांचे वीजबिल न भरल्यामुळे ही रक्कम वाढत जाऊन ती शाळेच्या भरण्याच्या आवाक्याबाहेर जाते. या थकीत बिलावर व्याज लावून मोठमोठ्या रकमेचे बिल जि.प.च्या शाळांकडे थकीत राहते. ते मिळणार असल्याची अपेक्षा संपल्यानंतर महावितरणच्या वीजजोडणी तोडण्याच्या कारवाईला शाळेला तोंड द्यावे लागत असल्याचे वास्तव याआधीही डीपीसीमध्ये ऐकायला मिळाले आहे.एक हजार ३३१ शाळांचा प्रश्न सुटणारया कारवाईवर मात करण्यासाठी सेवाकरातून कमी वीजबिल रक्कम भरावी लागणार असल्यामुळे जि.प.ने ग्रामपंचायतींवर शाळांचे बिल भरण्याची जबाबदारी सोपवली आहे. तसा ठरावही सर्वसाधारण सभेत केला आहे. यास अनुसरून प्राथमिक शिक्षण विभागाने संबंधित तालुक्यांच्या पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना लेखी आदेश काढून शाळांचे वीजबिल ग्रामपंचायतींना भरण्याचे आदेश जारी केले आहेत. या वीजबिलाची रक्कम सेवाकरात भरण्यासाठी संबंधित शाळेनेदेखील ग्रामपंचायतींच्या निदर्शनात आणून देण्याचे सूचित केले आहे. त्यासाठी आवश्यक तो पत्रव्यवहार ग्रामपंचायतींना करण्याचे मार्गदर्शनही केले आहे. यामुळे जि.प.च्या एक हजार ३३१ शाळांचे वीजबिल आता त्यात्या ग्रामपंचायतींद्वारे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :thaneठाणे