शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

फेब्रुवारीत येणार वीज बिल कमी

By admin | Updated: December 14, 2015 00:37 IST

वीज वितरण कंपनीने वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार वीज वापरावर २० टक्के इंधन अधिभार लावल्याने वीज बिले वाढीव स्वरुपात येत

मुरलीधर भवार,  कल्याणवीज वितरण कंपनीने वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार वीज वापरावर २० टक्के इंधन अधिभार लावल्याने वीज बिले वाढीव स्वरुपात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. येत्या जानेवारी महिन्यापर्यंत इंधन अधिभारामुळे वाढीव बिले ग्राहकांना येतील. जानेवारीनंतर अधिभाराचा त्रास ग्राहकांना नसेल असे महावितरणच्या अधिकारयांनी स्पष्ट केले आहे. वीजेची बिले जास्त येत असल्याच्या तक्रारी नागरीकांकडून येत असल्याने कल्याण शिवसेनेने वीज वितरण कंपनीच्या तेजस्विनी कार्यालयावर धडक दिली. होती. शिवसेनेच्या पाठोपाठ मनसेच्या वतीने गुरुवारी डोंबिवली वीज कार्यालयात जाऊन जाब विचारला गेला. वाढीव वीज बिल येण्याचे कारण इंधन अधिभार समायोजन आहे. वीज तयार करण्यासाठी काही ठिकाणी गॅस व कोळशाचा वापर केला जातो. गॅस व कोळशाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत वाढली आहे. वीज तयार करणाऱ्या कंपन्यांसोबत अटी शर्तीसह करार केलेला असतो. वाढीव इंधन दराला कंपनी पैसे मोजते. त्यात असलेली तफावत भरुन काढण्यासाठी इंधन अधिभार लावण्यात आला आहे.वीज नियामक आयोगाच्या मान्यतेनुसार जून २०१५ पासून वीज बिलात २० टक्के इंधन अधिभार वसूल करण्यात येत आहे. वीज वितरण कंपनीकडे हे आदेश येण्यास विलंब झाला. त्यामुळे त्याची अंमलबजावणी उशिरा झाली. वीज परिमंडळातील ग्राहकांची संख्या २५ लाखकल्याण परिमंडळात येणारा परिसर-कल्याण डोंबिवली पूर्व पश्चिम, टिटवाळा, आंबिवली, शहाड, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, बदलापूर, ग्रामीण, शहापूर, मुरबाड, वसई, विरार, पालघर, पनवेल, पेण आणि रोहा, मुरबाड तालुक्यातील सासणे, धसई, सरळगाव, टोकावणे, नारीवली, आघाशी तर शहापूर तालुक्यातील डोळखांब, शेणवा, वैतरणा, कसारा याठिकाणी १२ तासाचे भार नियमन सुरु आहे. या परिसरात ४५ टक्के पेक्षा जास्त वीजेचे लॉसेस आहेत. २००७ साली राज्यात वीजेचा तुटवडा होता. तेव्हा पासून वीज भारनियमन लागू करण्यात आले होते. मात्र सध्या मुबलक वीज असल्याने मागेल त्याला वीज पुरवठा दिला जाऊ शकतो. शहरी भागात भारनियमन शून्य आहे. मात्र ग्रामीण भागात ४० टक्के पेक्षा जास्त लॉसेस आहेत. त्याठिकाणी ६ ते १५ तास भारनियमन केले जात आहे. ग्राहकांना शिस्त लागावी यासाठी हे भारनियमन आहे. मात्र यामुळे ग्रामिणभागातील विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत.