डोंबिवली : माघ पौर्णिमेनिमित्त शिवसेनेने शनिवारी अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंगगड येथे काढलेल्या यात्रेवर ठाणे आणि उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीचे सावट होते. या यात्रेत दरवर्षीप्रमाणे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसली नाही. मात्र, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार सुभाष भोईर, आमदार बालाजी किणीकर आदींनी हेलिकॉप्टरद्वारे वारी करत मलंगबाबाचे दर्शन घेत आरती केली.यंदा निवडणुकीमुळे ठाणे, उल्हासनगर येथील ठिकाणांचे केवळ प्रमुख पदाधिकारी येथे उपस्थित होते. तर, कल्याण-डोंबिवलीतील बहुसंख्य कार्यकर्ते तेथे गेले होते. पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महापौर राजेंद्र देवळेकर, ग्रामीणचे अध्यक्ष प्रकाश पाटील, डोंबिवली शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी उपस्थित होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी श्रीमलंगमुक्तीच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. मलंगगडावर सुविधा पुरवणारहिंदूंची वहिवाट थांबणार नाही. त्यांना होणाऱ्या गैरसोयींवर खासदार शिंदे यांच्यासह सगळ्यांचे लक्ष आहे. लवकरच तेथे विविध सुविधा पुरवल्या जातील. त्यासाठी आवश्यक तो निधी शिंदे यांनी दिला आहे. पालकमंत्रीही त्यात आवर्जून लक्ष देत आहेत, असे लांडगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
श्रीमलंग यात्रेवर निवडणुकांचे सावट
By admin | Updated: February 13, 2017 04:41 IST