शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन सभापतीपदाची निवडणूक ५ एप्रिलला

By admin | Updated: March 31, 2017 05:40 IST

केडीएमसीच्या परिवहन सभापतीपदाची निवडणूक ५ एप्रिलला दुपारी ३.३० वाजता होणार आहे. या वेळी पिठासीन

कल्याण : केडीएमसीच्या परिवहन सभापतीपदाची निवडणूक ५ एप्रिलला दुपारी ३.३० वाजता होणार आहे. या वेळी पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर उपस्थित राहणार आहेत. या निवडणुकीसाठी सोमवार, ३ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. यंदा सभापतीपदाची टर्म भाजपाची असताना शिवसेनाही उमेदवार उभा करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ही निवडणूकही रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.परिवहन समितीत शिवसेना ६, भाजपा ५, काँग्रेस आणि मनसे प्रत्येकी १ असे पक्षीय बलावल आहे. फेब्रुवारी अखेरीस शिवसेनेचे दोन आणि भाजपा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी १ सदस्य निवृत्त झाला. यानंतर झालेल्या सदस्यांच्या निवडणुकीत शिवसेनेचे आणि भाजपाचे प्रत्येकी ३ सदस्य निवडून आले. त्यात मनोज चौधरी, संजय पावशे, मधुकर यशवंतराव हे शिवसेनेचे आणि भाजपाचे संजय राणे, प्रसाद माळी, कल्पेश जोशी यांचा समावेश आहे. दरम्यान, आता सभापतीपदाची निवडणुक जाहीर झाली असून, सभापतीपद कोणाच्या वाट्याला जाणार, याबाबत उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)नेत्यांचे दावे-प्रतिदावेसभापतीपद मागील वेळेस शिवसेनेकडे होते. यंदा त्यावर भाजपाचा दावा आहे. यासंदर्भात गटनेते वरुण पाटील म्हणाले की, ‘यंदाची सभापतीपदाची टर्म भाजपाची आहे. त्यासंदर्भात वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू आहे.’ तर दुसरीकडे ‘महिला-बालकल्याण’चे सभापतीपद भाजपाला दिल्याने परिवहनचे सभापतीपद सेनेकडेच राहील, असे शिवसेनेचे गटनेते रमेश जाधव म्हणाले.