शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी वकील संघटनेची निवडणूक म्हणजे नव्या परिवर्तनाची नांदी - ऍड.किरण चन्ने

By नितीन पंडित | Updated: March 24, 2023 19:19 IST

या निवडणुकीत चन्ने हे अध्यक्ष पदाचे उमेदवार होते मात्र अवघ्या १३ मतांनी चन्ने यांचा पराभव झाला असून अध्यक्ष पदी ऍड. दिनेश्वर पाटील हे विजयी झाले आहेत.

भिवंडी -भिवंडी वकील संघटनेची निवडणूक म्हणजे नव्या परिवर्तनाची नांदी आहे अशी प्रतिक्रिया भीमा कोरेगाव आयोगाचे वकील ऍड किरण चन्ने यांनी शुक्रवारी वंजारपट्टी नाका येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. भिवंडी वकील संघटनेच्या २०२३-२५ या दोन वर्षांच्या कार्यकारणीसाठी २१ मार्च रोजी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत चन्ने हे अध्यक्ष पदाचे उमेदवार होते मात्र अवघ्या १३ मतांनी चन्ने यांचा पराभव झाला असून अध्यक्ष पदी ऍड. दिनेश्वर पाटील हे विजयी झाले आहेत.       भिवंडी न्यायालयात अनेक वर्षांपासून काही मोजक्या लोकांची मक्तेदारी होती हि मक्तेदारी आपण मोडण्याचा यावेळी प्रयत्न केला असून आमच्या परिवर्तन पॅनलचे ऍड सुयोग म्हात्रे हे सरचिटणीस पदी तर ऍड सुधीर भोईर हे खजिनदार पदी निवडून आले आहेत त्यामुळे ही महत्वाची पदे परिवर्तन पॅनलकडे असल्याने माझी जरी हार झाली असली तरी परिवर्तनवादी वकील बंधू भगिनींचा व पॅनलचा विजय झाला आहे असेही चन्ने यांनी यावेळी सांगितले.           भिवंडी वकील संघटनेच्या मागील कार्यकारिणीचे अध्यक्ष ऍड मंजीत राऊत यांनी वकील संघटनेच्या बँक खात्यात २१ लाख रुपयांची एफडी केली आहे. यापूर्वी इतकी मोठी रक्कम वकील संघटनेच्या बँक खात्यात कधीच जमा झालेली नव्हती. तसेच न्यायालयात ग्रंथालय व वकिलांसाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधा मिळवून दिल्या आहेत.ऍड राऊत हे आमच्या सोबत असल्याने काही वकिलांना राऊतांनी केलेले नवे परिवर्तन पचनी पडले नसल्याने जातीपातीच्या राजकारणाबरोबरच राजकीय नेते पुढाऱ्यांचा हस्तक्षेप करून विरोधी पॅनलच्या वकिलांनी हि निवडणूक लढवली व जिंकली असल्याचा आरोप यावेळी चन्ने यांनी केला असून परिवर्तन पॅनलला अध्यक्षपद जरी मिळाले नसले तरी सरचिटणीस व खजिनदार हि महत्वाची पदे आपल्या पॅनलकडे असल्याने भविष्यात सक्षम विरोधी पक्षनेता व वकिलांच्या न्याय हक्कासाठी आपण सदैव तत्पर राहून कार्य करू अशी प्रतिक्रिया शेवटी ऍड किरण चन्ने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी