उल्हासनगर : महापालिका महापौर, उपमहापौरासह स्वीकृत नगरसेवक व स्थायी समिती सदस्यांची निवड ५ एप्रिलला दुपारी तीन वाजता होणार आहे. भाजपा व शिवसेनेने महापौर पदावर दावा सांगितला असून पालिका सत्तेसाठी घोडेबाजाराला उत आला आहे. नगरसेवक फुटीच्या भीतीने सर्वच नगरसेवक येत्या दोन दिवसात भूमिगत होणार आहे. उल्हासनगर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. दोन्ही पदासाठी अर्ज भरण्याची तारीख ३० मार्च असून निवडणुकीच्या दिवशी अर्धा तास आधी अर्ज मागे घेतले जाणार आहे. ५ स्वीकृत नगरसेवकांची निवड ५ एप्रिलला होणार असून त्यांची अर्ज भरण्याचे तारीख ३१ मार्च रोजी दुपारी ३ ते ५ वेळेत आहे. तर १६ स्थायी समिती सदस्यांची निवड नवनिर्वाचित महापौर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. महापौर-उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर होताच शिवसेना व भाजपा पक्षात चैतन्याचे वातावरण असून दोघांनीही महापौर पदावर दावा केला. यामुळे फोडाफोडीचे राजकारण सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)
महापौरपदाची निवडणूक जाहीर
By admin | Updated: March 25, 2017 01:19 IST