शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंचा ठाणे शहर स्वच्छ सर्वेक्षणात तेराव्या क्रमांकावर  

By अजित मांडके | Updated: October 1, 2022 20:53 IST

इंडियन स्वच्छता लीग' मध्ये ठाणे शहराचा देशात पहिला क्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : इंडियन स्वच्छता लीग" कार्यक्रमाअंतर्गत स्वच्छ अमृत महोत्सव ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. यामध्ये शहराच्या विविध ठिकाणी अनेक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हा महोत्सव यशस्वी केला. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्यात इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ठाणे शहराचा क्रमांक राष्ट्रीय पातळीवर पहिला क्रमांक मिळाला आहे. भारत सरकारच्या वतीने सन २०२२ मध्ये केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये ठाणे शहराने देशात तेरावा क्रमांक तर राज्यात तिसरा क्रमांक पटकवला आहे. विशेष म्हणजे गतवर्षीचा क्रमांक राखण्यात शहराला यश आले आहे.

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नगर विकास विभागाच्यावतीने दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येते. सन २०२२ रोजी कच-याचे संकलन व त्याची वाहतूक, प्रक्रिया, साफसफाई, जनजागृती, क्षमतावृध्दी आदी निकषांवर स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते. या सर्वेक्षणामध्ये सन २०२० ला  ठाणे शहराने ५७ व्या क्रमांकावरून देशात १४ व्या क्रमांकावर आघाडी घेतली होती. तर सन २०२१ ला हाच क्रमांक राखण्यात यश आले होते. दरम्यान, राज्यात स्वच्छ  सर्वेक्षणात ठाणे शहराने तिसरा क्रमांक पटकवला आहे.  

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार "इंडियन स्वच्छता लीग" कार्यक्रमाअंतर्गत स्वच्छ अमृत महोत्सव ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. यामध्ये शहराच्या विविध ठिकाणी अनेक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हा महोत्सव यशस्वी केला. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्यात इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ठाणे शहराचा क्रमांक राष्ट्रीय पातळीवर पहिला क्रमांक मिळाला असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाने सांगितले.

टॅग्स :thaneठाणे