शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजकुमार इस्टेटीतून बेदखल

By admin | Updated: April 30, 2017 04:29 IST

महाराष्ट्र दिनापासून लागू होणाऱ्या रेरा अर्थात रिअल इस्टेटीसंदर्भातील नव्या कायद्याचा फटका सज्ञान होणाऱ्या मुलांना बसण्याची भीती कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ठाणे : महाराष्ट्र दिनापासून लागू होणाऱ्या रेरा अर्थात रिअल इस्टेटीसंदर्भातील नव्या कायद्याचा फटका सज्ञान होणाऱ्या मुलांना बसण्याची भीती कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वडिलांनी कर्ज काढून घेतलेल्या घरावर मुलाला पाणी सोडावे लागण्याची चिन्हे असल्याची भीती कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अविभक्त कुटुंबे किंवा एकत्र कुटुंब पद्धतीला केंद्र आणि राज्य सरकारच्या तरतुदी मारक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. भविष्यात मुलांसाठी घर असावे किंवा आपल्या म्हातारपणाची सोय म्हणून घरात गुंतवणूक करणाऱ्या,त्यासाठी अतिरिक्त घर घेणाऱ्यांना या तरतुदींचा मोठा फटका बसेल, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.आतापर्यंत वडिलांच्या स्थावर इस्टेटीत मुलगा सहजपणे वारस मानला जात असे. मात्र या नव्या कायद्यातील तरतुदींनुसार तो कायद्याने सज्ञान होईपर्यंतच वडिलांनी कर्ज काढून घेतलेल्या घरावर त्याचा अधिकार असेल, असा त्यातील तरतुदींचा अर्थ निघतो. मुलीचा हक्क मात्र लग्न होईपर्यंत मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे या तरतुदींचा वेगळा अर्थ लावला तर मुलगा अशा मालमत्तेतून बेदखल होऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. या स्वरूपाच्या घरांबाबत मुलाचे हक्क मर्यादित होत असल्याने सोसायट्याही त्याला मालक न मानता भाडेकरू मानून त्याच्याकडून जादा मेन्टेनन्स वसूल करू शकतात. त्याचाही फटका मुलांना बसू शकतो. अशी अतिरिक्त घरे विकताना सोसायट्या किती रक्कम आकारू शकतीत, याबाबतही संदिग्धता असल्याचा फटका घरांच्या खरेदी- विक्रीला बसेल, असा त्यांचा अंदाज आहे. शिवाय जर अशा घरात वेगळा भाडेकरू ठेवला, तर त्या भाड्याबाबतच्या तरतुदीही जाचक करण्यात आल्याचा मुद्दा पुढे आला आहे. अपार्टमेंटच्या तरतुदीत झालेल्या दुरूस्तीचा फटकाही सज्ञान मुलांना बसण्याची भीती आहे. यातून अविभक्त कुटुंबांना मोठ्या कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)संदिग्धता दूर करा...वडिलांनी कर्ज काढून घेतलेल्या घराबाबत केलेल्या कायदेशीर तरतुदींबाबत राज्य सरकारने सविस्तर स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. तसे झाले तर त्याबाबतची संदिग्धता दूर होईल. सोसायट्यांनाही ते नियम मार्गदर्शक ठरतील.अन्यथा मालकीचे घर असूनही ते मुलांना वापरण्यास दिले, तर त्यांना दुप्पट किंवा सोसायटी ठरवेल तसा मेन्टेनन्स भरावा लागण्याची भीती दिवाणी कायद्याच्या अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.शहरांची व्याख्याही गोंधळाची...गरीबांना स्वस्तात घरे देणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेसाठी रेरा कायदा उपयुक्त असला, तरी या कायद्यातील शहरांची व्याख्याही गोंधळाची असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे.महापालिका, नगरपालिका क्षेत्रांभोवती असलेल्या गावांत जर मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असतील; टोलेजंग इमारती असतील तर त्यांना गाव म्हणणार का? त्यांना नेमक्या कोणत्या तरतुदी लागू होतील? त्यांच्यासाठी नियम शिथिल असतील, तर शहरांच्या परीघातील अनेक परिसर ठरवून किंवा जाणीवपूर्वक ‘ग्रामीण’ राहण्याच्या धोक्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.त्यासाठी त्यांनी कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई अशा महापालिकांतून वगळलेल्या गावांचा, मोठ्या ग्रामपंचायतींचा- नगर पंचायतींचा दाखला दिला.