शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बारामती अ‍ॅग्रोकडून ठामपाला आठ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:42 IST

ठाणे : बारामती अ‍ॅग्रो कंपनी आणि आमदार रोहित पवार यांच्या वतीने ठाणे महानगरपालिकेला राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष आनंद ...

ठाणे : बारामती अ‍ॅग्रो कंपनी आणि आमदार रोहित पवार यांच्या वतीने ठाणे महानगरपालिकेला राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या हस्ते आठ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर गुरुवारी प्रदान करण्यात आले. यावेळी ठामपाचे विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण हे उपस्थित होते.

कोरोनाबाधित रुग्णांसाठी सुरुवातीच्या काळात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे उपकरण प्रभावी ठरते. या साधनात इलेक्ट्रिक प्रणालीवर हवा आणि पाण्याद्वारे ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. एकाच वेळी पाच लीटर ऑक्सिजन सांभाळण्याची क्षमता असल्याने याचा कोरोना रुग्णांना चांगला लाभ होतो. यात पाच लीटरचे तीन आणि सात लीटरचे पाच असे आठ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठामपाचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे परांजपे यांनी सुपूर्द केले.

यावेळी परांजपे यांनी बारामती अ‍ॅग्रोने राज्यात ५०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले आहेत. सध्याची अवस्था पाहता पवार यांनी आणखी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठाण्याला द्यावेत, अशी मागणी आपण करणार असल्याचे सांगितले.

यावेळी परिवहन समिती सदस्य नितीन पाटील, उपायुक्त संदीप माळवी, विश्वनाथ केळकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. देवगीकर, डॉ. खुशबू टावरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा अध्यक्ष विक्रम खामकर, सरचिटणीस रवींद्र पालव ठाणे विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, उथळसर ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, रायलादेवी ब्लॉक अध्यक्ष रत्नेश दुबे ,कार्यालयीन सहसचिव संकेत नारणे आदी उपस्थित होते.