शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

चिठ्ठ्यांमुळे सभापतींसह स्थायीचे आठ सदस्य निवृत्त

By admin | Updated: November 18, 2016 03:16 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे आठ सदस्य गुरुवारी निवृत्त झाले.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे आठ सदस्य गुरुवारी निवृत्त झाले. शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. निवृत्त झालेल्यांमध्ये शिवसेनेचे चार, भाजपाचे तीन आणि काँग्रेसचा एक सदस्य आहे. विशेष म्हणजे, चिठ्ठीमुळे सभापती संदीप गायकर यांनाही निवृत्त व्हावे लागले. तर, निवृत्त न झालेल्या उर्वरित आठ जणांना आणखी एक वर्षाचा कालावधी मिळाला आहे.महापालिकेच्या १६ जणांच्या स्थायी समिती सदस्यांमध्ये गायकर, रमाकांत पाटील, विशाल पावशे, शिवाजी शेलार, शैलेश धात्रक, विकास म्हात्रे (सर्व भाजपा), दशरथ घाडीगावकर, मोहन उगले, राजाराम पावशे, प्रेमा म्हात्रे, हर्षाली थविल, राजेश मोरे, राजवंती मढवी-शेट्टी (सर्व शिवसेना), कासीफ तानकी (शिवसेना सहयोगी अपक्ष) यांच्यासह ज्योती मराठे (मनसे) आणि जान्हवी पोटे (काँग्रेस) होते. १ डिसेंबरला समितीचा वर्षाचा कालावधी संपत असल्याने आठ चिठ्ठ्या काढून निवृत्ती प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यासाठी प्रत्येक सदस्याच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. गजानन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आठ चिठ्ठ्या काढून त्या केडीएमसीचे सचिव सुभाष भुजबळ यांच्याकडे दिल्या. त्यानुसार, गायकर, धात्रक, पाटील, मढवी, थविल, पावशे, तानकी आणि पोटे हे निवृत्त झाले.या निवृत्ती प्रक्रियेत सहयोगी अपक्षासह शिवसेनेचे चार सदस्य निवृत्त झाले आहेत. भाजपानंतर आता पुढचे सभापतीपद शिवसेनेला मिळणार आहे. त्यामुळे सदस्यपद मिळण्यासाठी शिवसेनेत भाऊगर्दी आहे. त्यातच पुढचा सभापती कोण, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. समितीत स्थान अबाधित राहिलेल्यांपैकी एकाला याचा मान मिळतो का, की नवीन सदस्याची वर्णी लागते, याकडे आता लक्ष लागले आहे. निवृत्त झालेल्या सदस्यांचा कालावधी ३० नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. निवृत्त न झालेले आठ आणि नवीन नियुक्त होणारे आठ सदस्य, अशा १६ सदस्यांची समिती स्थापन झाल्यानंतर सभापतीपदाची निवडणूक होईल. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेच्या वेळी पावशे आणि म्हात्रे या भाजपाच्या दोन सदस्यासंह काँग्रेसच्या पोटे अनुपस्थित होत्या. (प्रतिनिधी)