शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अबब! ढिगाऱ्याच्या संरक्षणासाठी आठ लाख खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 23:23 IST

भिवंडी पालिकेचा भोंगळ कारभार; ८ महिन्यांपूर्वी कारवाई

भिवंडी : शहारातील बेकायदा इमारती जमीनदोस्त केल्यानंतर ढिगारा वेळेवर उचलला जात नाही. ढिगाºयाची व्हिलेवाट न लावल्याने पालिकेला त्या ठिकाणी २४ तास सुरक्षारक्षक तैनात करावे लागतात. या सुरक्षारक्षकांवर प्रशासनाने आठ लाखांची उधळण केल्याचा आरोप स्थायी समितीचे सभापती हलीम अन्सारी यांनी केला आहे.शांतीनगर परिसरातील पिरानी पाडा येथे तळ अधिक पाच माजली बेकायदा इमारत बांधली होती. त्या विरोधात मुंबई उच्च नायायालयात दाखल याचिकेवर सुनावणी दरम्यान बांधकाम जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. प्रशासनाने इमारत जमीनदोस्त करण्यासाठी शहा एंटरप्रायझेस या कंत्राटदाराला कंत्राट दिले होते. कंत्राटाची रक्कम दहा लाखाच्या घरात असल्याचे समजते. ही इमारत २७ जून २०१९ रोजी संपूर्ण इमारत पाडण्यात आली. इमारत पाडल्यानंतर हा ढिगारा उचलण्यासाठी प्रशासनाला आठ महिने उलटूनही मुहूर्त मिळालेला नाही.ढिगाºयात सळई व लोखंड असल्याने जूनपासून ढिगाºयाच्या रक्षणासाठी सुरक्षारक्षकांचा पाहरा ठेवण्यात आला आहे. उपायुक्त दीपक कुरळेकर यांनी पालिकेच्या सुरक्षारक्षकांवर या ढिगाºयाच्या संरक्षणाची जबाबदारी दिली असून दिवसरात्र एकूण सहा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची सेवा पालिका कार्यालयासाठी असताना त्यांना इतरत्र सुरक्षारक्षक म्हणून नेमणे चुकीचे असल्याचे स्पष्ट झाल्याने मुख्य सुरक्षा अधिकारी सुभाष चव्हाण यांनी ही बाब आयुक्तांच्या लक्षात आणून दिल्यावर सहा पैकी चार सुरक्षारक्षक त्या ठिकाणाहून कमी केले. सध्या दोन सुरक्षारक्षक या ढिगाºयाचे संरक्षण करत आहेत. त्यांच्या वेतनावर आठ लाख खर्च केला आहे.भोंगळ कारभारबेकायदा बांधकामांवर वेळीच कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती. परंतु अशा प्रकारे ढिगाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जेवढ्या किमतीचा मुद्देमाल ढिगाºयाखाली गाडला गेला नाही त्याहून अधिक रक्कम प्रशासनाने सुरक्षेसाठी खर्च केली आहे. अधिकाºयांच्या भोंगळ कारभारामुळे पालिकेवर विनाकारण आर्थिक बोजा होत असल्याची टीका स्थायी समितीचे सभापती हलीम अन्सारी यांनी केली आहे.