शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हंडाभर पाण्यासाठी सुरू आहे ग्रामस्थांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:14 IST

आदिवासी महिला त्रस्त : सांडपाण्यामुळे बोअरवेलचे पाणी दूषित

वसंत पानसरे किन्हवली : तापमानात वाढ झाल्याने पाण्याची पातळी खाली गेली आहे. शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईने सध्या उग्र रूप धारण केले आहे. याबाबत कृती अराखडा बनवूनही उपाय योजना होत नसल्याने अनेक गाव, पाडे पाण्यासाठी आक्रोश करत आहेत. आसनगावपासून हाकेच्या अंतरावर असलेले प्लॉटपाडा या आदिवासी वस्तीत पाणीटंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी येथील आदिवासींची वणवण होत आहे. परंतु प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही.

वेहळोवी (बु) ग्रामपंचायत हद्दीत प्लॉटपाडा ही आदिवासी वाडी समाविष्ट आहे. शंभराच्यावर येथे घरे आहेत. अनेक वर्षापासून या वाडीत पाण्याबाबत ठोस उपाययोजना न झाल्यामुळे टंचाई निर्माण झाली आहे. या पाड्यात एक विहीर असून ती कोरडी ठाक पडली आहे. सरकारने दोन विंधन विहीरी येथे दिलेल्या आहेत. परंतु त्यातील एक विंधन विहीर कायमची बंद पडली असून एका विंधन विहिरीतून तीन ते चार दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जातो. पण तो ही कमी प्रमाणात होत असल्यामुळे हंडाभर पाण्यासाठी येथील महिलांना कसरत करावी लागत आहे.

या ठिकाणी एक बोअरवेल आहे, पण या बोअरवेल शेजारीच एका खाजगी हॉटेलचे सांडपाणी साचून राहिल्यामुळे या बोअरवेलचे पाणी दूषित झाले आहे. गेली अनेकवर्ष याबाबत तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नसल्यामुळे या दूषित पाण्यावरच हे अदिवासी आपली तहान भागवत आहेत.

गेली अनेकवर्ष आमच्या वाडीत पाणीटंचाई असते. परंतु उन्हाळ््यात जास्त पाणीटंचाई निर्माण होत असून वाडीत असलेल्या बोअरवेलचे पाणी खाजगी हॉटेलच्या सांडपाण्यामुळे दूषित झाले आहे. प्रशासनाने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. - प्रशांत गडगे, सामाजिक कार्यकर्ते

पाणीपुरवठा विभागाकडून त्या भागात कर्मचारी पाठवून माहिती घेऊन आवश्यक असल्यास त्या भागात तात्काळ पिण्याच्या पाण्यासाठी टँंकरची व्यवस्था करतो. ग्रामस्थांशी बोलून अधिक काय उपाययोजना करता येईल त्याबाबत चर्चा करु . - एम.आव्हाड, उपाभियंता