शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कच्च्याबच्च्यांचे प्रभावी समुपदेशन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 02:48 IST

ठाण्यातील अनेक मराठी शाळांची पटसंख्या वाढत असताना यात बाळकुम विद्यालयही कुठे मागे नाही.

- स्नेहा पावसकर ठाणे : ठाण्यातील अनेक मराठी शाळांची पटसंख्या वाढत असताना यात बाळकुम विद्यालयही कुठे मागे नाही. विद्यार्थ्यांसाठी घेतले जाणारे जादा शिकवणीवर्ग, ई-लर्निंगसारख्या उपक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे होणारे समुपदेशन आणि त्यातून त्यांना दिले जाणारे मार्गदर्शन, ही बाब शाळेच्या गुणवत्तावाढीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते आहे.बाळकुम येथील विद्या प्रसारक मंडळाचे बाळकुम विद्यालय याची स्थापना १९७७ साली ग.बा. म्हात्रे यांनी केली. शाळेत लहान शिशूपासून ते दहावी इयत्तेपर्यंतचे वर्ग भरतात. आजघडीला शाळेत सुमारे एक हजाराहून अधिक विद्यार्थी अध्ययन करतात. प्रत्येक इयत्तेच्या दोन तुकड्या असून एका तुकडीत सेमी इंग्रजी शिकवले जाते. पहिली इयत्तेपासूनच सेमी इंग्रजी आहे. विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान आणि इंग्रजी हे विषय इंग्रजीतून शिकवले जातात. यासाठी कोणत्याही पालकांवर दबाव आणला जात नाही. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा अंदाज घेत त्यांना सेमी इंग्रजीसाठी प्रवेश दिला जातो. सुरुवातीला सेमी इंग्रजी माध्यमात प्रवेश घेताना पालक चिंताग्रस्त दिसायचे. मात्र, आता बहुतांशी पालक आपल्या पाल्याला सेमी इंग्रजीत प्रवेशासाठी उत्सुक दिसतात. शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणीवर्ग घेतले जातात. विशेष म्हणजे अभ्यासात कच्चे असलेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकाचे शाळेतर्फे मोफत समुपदेशन केले जाते. त्यातून विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा, याचे मार्गदर्शन केले जाते. तसेच ध्यानधारणेच्या माध्यमातून एकाग्रता कशी वाढवावी, स्मरणशक्ती कशी वाढवावी, याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. पालकांचे समुपदेशन करून त्यांना विद्यार्थ्यांवर ताण न आणता कसा अभ्यास करवून घ्यायचा, याचे मार्गदर्शन केले जाते. याशिवाय, विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तयारी व्हावी, म्हणून त्यांना स्कॉलरशिप, प्रज्ञाशोधसारख्या परीक्षेला बसवले जाते. अवांतर वाचनाची आवड लागावी, या उद्देशाने यावर्षीपासून विद्यार्थ्यांसाठी वाचनतासिका उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वर्गात अनेक विषय विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिकवले जातात.>शाळेत विविध उपक्रम राबवण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष देवराम भोईर आम्हाला कायम प्रोत्साहन देतात. राबवल्या जाणाऱ्या अनेक उपक्रमांना पालक आणि विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. शाळेतील या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यालयाची गुणवत्ता आणि पटसंख्याही वाढते आहे. आमच्यामराठी माध्यमाच्या शाळेतून शिकलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वी ठरले आहेत.- एच.एस. पाटील, मुख्याध्यापक, माध्यमिक विभाग, बाळकुम विद्यालय