शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मुलांचा शिक्षणाचा मार्ग सुखकर; ठाकूरपाड्यात सायकलींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 00:41 IST

टीम परिवर्तन, ‘युवा संस्कार’चा उपक्रम

डोंबिवली : टीम परिवर्तन या युवा गटाने युवा संस्कार बहुद्देशीय संस्थेच्या मदतीने कल्याण तालुक्यातील गोवेली येथील ठाकूरपाडा या आदिवासी पाड्यावरील मुलांना सायकलींचे वाटप केले. त्यामुळे आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा मार्ग सुखकर होणार आहे.

नागरिकांकडून जमा झालेले शैक्षणिक साहित्य, कपडे आणि घरगुती उपयोगी साहित्याचे वाटप टीम परिवर्तन या युवकांच्या गटाद्वारे सातत्याने आदिवासी पाड्यांवर केले जाते. तसेच ग्रंथालय उभारणीही केली जात आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ठाकूरपाडा येथील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी पायपीट थांबावी, यासाठी गरजू मुलांना एकूण १२ सायकलींचे यावेळी वाटप करण्यात आले. ठाणे येथील सूर्या आणि प्रभात सोसायटीच्या सदस्यांनी आपल्या सोसायटीतील नादुरुस्त सायकली टीम परिवर्तनाला दिल्या आहेत. रूपाली देशमुख यांनी त्यासाठी विशेष मदत केली. सकल आदिवासी संस्थेच्या महिलांनी सायकलींची दुरुस्ती करण्यासाठी आर्थिक मदत केली.दरम्यान, सायकलींचे वाटप करताना ‘युवा संस्कार’चे सोमनाथ राऊत, ‘टीम परिवर्तन’चे कार्यकर्ते अनिकेत बारापात्रे, नामदेव येडगे, संकेत जाधव, त्रिलोचन परब, तुषार वारंग यावेळी उपस्थित होते. वंचित घटकांसाठी सुरू असलेल्या शैक्षणिक साहित्य संकलन त्याचबरोबर टीम परिवर्तनाच्या इतर उपक्रमात युवकांनी सामील होण्याचे आवाहान ही अविनाश पाटील यावेळी केले.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना