शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणमंत्री,ं कुलगुरूंविरोधात निदर्शने

By admin | Updated: July 7, 2017 06:12 IST

मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षांचे निकाल रखडल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षांचे निकाल रखडल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी गुरुवारी बिर्ला कॉलेजबाहेर हे आंदोलन केले. या वेळी कुलगुरू संजय देशमुख व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ््याचे दहन करण्यात आले. विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक दर्शन बाबरे, पदाधिकारी सतीश चव्हाण, तुषार शेलार, सुशांत शेलार, मिहिर देसाई व विद्याथी त्यात सहभागी झाले. या वेळी त्यांनी विद्यापीठ प्रशासन, देशमुख व तावडे यांच्याविरोधात घोषणा दिल्या.देसाई यांनी सांगितले की, ‘बीए, बीएस्सी, बीकॉम याच्या परीक्षा एप्रिल-मेमध्ये झाल्या. विद्यापीठाच्या नियमानुसार, निकाल ३० दिवसांत जाहीर करणे आवश्यक आहे. काही कारणास्तव विलंब झाल्यास आणखी १५ दिवसांची मुभा आहे. यंदाच्या वर्षी प्रत्येक विद्यार्थ्याचा पेपर स्कॅन करून तो तपासण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे त्यात दिरंगाई झालेली आहे. आतापर्यंत २० टक्केच पेपर तपासून झाले आहेत. परीक्षेचा निकाल लागला नसला तरी एमए, एमकॉम, एमएस्सीची प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाने सुरू केली आहे. निकाल लागला आणि प्रवेश घेणारा विद्यार्थी नापास झाला तर त्याला प्रवेश दिला जाणार नाही. त्याचा प्रवेश अर्ज आपोआपच बाद होणार आहे. मात्र प्रवेशासाठी भरलेले शुल्क त्याला परत मिळणार नाही. निकालास उशीर झाल्याने त्याचा फटका विद्यार्थ्याना बसला आहे. प्रवेशाला विलंब झाल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षात गॅप पडणार आहे.’