शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अगोदर नगरपालिका, मगच ग्रोथ सेंटर,२७ गावांच्या संघर्ष समितीचा पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 03:17 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांकरिता अगोदर नगरपालिका स्थापन करा आणि मगच ग्रोथ सेंटरच्या कामाला सुरुवात करा, अशी भूमिका सर्वपक्षीय संघर्ष समितीने घेतली आहे.

मुरलीधर भवार कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांकरिता अगोदर नगरपालिका स्थापन करा आणि मगच ग्रोथ सेंटरच्या कामाला सुरुवात करा, अशी भूमिका सर्वपक्षीय संघर्ष समितीने घेतली आहे. एमएमआरडीएच्या नियोजन अधिकाºयाला याच आशयाचे निवेदन समितीने सादर केले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावांकरिता स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचे जे आश्वासन दिले होते, त्याचे पालन न करता कल्याण ग्रोथ सेंटरच्या उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे, याकडे लक्ष वेधत संघर्ष समितीने जोपर्यंत स्वतंत्र नगरपालिका जाहीर केली जात नाही, तोपर्यंत ग्रोथ सेंटरला विरोध राहिली, अशी भूमिका स्पष्ट केली.कल्याण ग्रोथ सेंटरसाठी एक हजार ८९ हेक्टर जागा आवश्यक आहे. ही जागा संपादित न करता या जागेपैकी ५० टक्के जागा शेतकरी व जमीनमालकास विकसित करून परत केली जाणार आहे. त्यासाठी सरकारने एक हजार ८९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. ग्रोथ सेंटरच्या कामासाठी ३० आॅक्टोबर रोजी गावकºयांसोबत एमएमआरडीएने एक बैठक घेतली. सेंटरची संकल्पना समजावून सांगितली. मात्र, ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या सगळ्याच शंकांचे निरसन निळजे येथील सभेत झालेले नव्हते. त्यानंतर, ५० टक्कयांऐवजी ७० टक्के जागा विकसित करून देण्याची मागणी पुढे आली. दरम्यान, जमिनीचे मोजमाप करण्याच्या कामाला गावकºयांनी विरोध केला. त्यामुळे बुधवारी पुन्हा निळजेतील काही ग्रामस्थांना एमएमआरडीएने अनौपचारिक चर्चेसाठी बोलावले होते. या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीने मंगळवारी मानपाडेश्वर येथे सभा घेतली. सरकारने २७ गावे महापालिकेत समाविष्ट केली. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये ग्रोथ सेंटरची घोषणा केली व निधी मंजूर केला.आॅक्टोबर २०१५ मध्ये पालिका निवडणुकीच्या जाहीर सभेत २७ गावांकरिता स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचे संकेत दिले. डोंबिवलीत २०१७ मध्ये पार पडलेल्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरूनही २७ गावे वेगळी करण्यास सरकार अनुकूल आहे. मात्र, उच्च न्यायालयात दोन याचिका प्रलंबित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेची मागणी २०१५ पासून प्रलंबित आहे. स्वतंत्र नगरपालिका जाहीर झाल्याखेरीज ग्रोथ सेंटर उभारू दिले जाणार नाही, असा निर्णय संघर्ष समितीने घेतला. समितीचे पदाधिकारी चंद्रकांत पाटील, गजानन मांगरूळकर, भगवान पाटील, लालचंद्र भोईर, दिलीप भोईर यांनी बुधवारी एमएमआरडीएने बोलावलेल्या बैठकीत नियोजन अधिकारी मिलिंद पाटील यांना निवेदन देत भूमिका स्पष्ट केली.>१५ दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकग्रोथ सेंटरसाठी घेतलेल्या जमिनीपैकी ५० टक्के नव्हे, तर ७० टक्के जागा विकसित करून द्यावी, अशी मागणी करत निळजेतील गावकºयांनी दोन वेळा जमीनमोजणीच्या कामाला विरोध केला होता. त्यामुळे त्यांना बुधवारी एमएमआरडीएने चर्चेकरिता बोलावले होते. त्यांच्या मागणीच्या निवेदनावर चर्चा झाली नाही. येत्या १५ दिवसांत मुख्यमंत्री व एमएमआरडीएच्या आयुक्तांसोबत बैठक बोलावली जाणार असल्याचे प्रकाश पाटील यांनी सांगितले. निळजे येथे एक खिडकी उघडून त्याद्वारे ग्रामस्थांचे शंकासमाधान केले जाणार होते. ही खिडकी सुुरूच झाली नसल्याकडे पाटील यांनी अधिकाºयांचे लक्ष वेधले.>कल्याण-शीळ रस्त्याच्यासहापदरीकरणासही विरोधभिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे सहापदरीकरण करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प जवळपास ३९० कोटी रुपये खर्चाचा आहे. प्रकल्पाच्या खर्चापैकी नऊ कोटी रुपये हे पुनर्वसनासाठी खर्च करण्यात येणार आहेत.मात्र, रस्त्याच्या सहा पदरीकरणामुळे कल्याण-शीळ मार्गालगतचे १५४ शेतकरी व जमीनमालक बाधित होत आहेत. त्यांना किती व कसा मोबदला देणार. त्यांच्या पुनर्वसनाचे काय, असे विविध प्रश्न संघर्ष समितीने उपस्थित केले आहेत. जोपर्यंत योग्य ती नुकसानभरपाई दिली जात नाही, तोपर्यंत सहापदरीकरणास संघर्ष समितीने विरोध दर्शवला आहे.याबाबतचे पत्रही राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकारीवर्गाला दिले आहे. या प्रकल्पासाठी जमीनमोजणी उद्या काटई गावानजीक होणार आहे. या जमीनमोजणीला बाधितांकडून विरोध केला जाणार आहे, असे समितीचे पदाधिकारी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका