शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

ई-कचऱ्याच्या विल्हेवाटीवर आता भर

By admin | Updated: July 5, 2017 06:08 IST

घनकचरा व्यवस्थापन आणि केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये केडीएमसीच्यावतीने

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : घनकचरा व्यवस्थापन आणि केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये केडीएमसीच्यावतीने विविध उपक्रम प्रस्तावित केले गेले असताना आता ‘घातक कचरा’ या स्वरूपात मोडणाऱ्या ई-कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित संस्थांचा शोध सुरू केला आहे. केडीएमसी हद्दीत कचरा विल्हेवाटीची समस्या जटील बनत आहे. आधारवाडीतील डम्पिंगची क्षमता संपली आहे. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने विविध ठिकाणी बायोगॅस प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यातच १५ जुलैपासून पूर्णपणे प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंधन घालण्याचे आदेश महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिले आहेत. दरम्यान, ओला-सुका कचऱ्यावर प्रक्रिया करण्याबरोबरच घातक कचरा म्हणविणाऱ्या ई कचऱ्याचे विघटन करण्याच्या दृष्टीने संबंधित संस्थांना केडीएमसीने आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. ई-कचरा गोळा करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणाऱ्या व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नोंदणी असणाऱ्या व्यावसायिकांनी १५ जुलैपर्यंत लेखी अर्ज सादर करावेत, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी केले आहे. ठिकठिकाणी कचरा गोळा करणारघातक कचऱ्यामध्ये बॅटऱ्या, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदी कचऱ्याचा समावेश आहे. हा ई-कचरा गोळा करण्यासाठी पालिकेतर्फे प्रत्येक प्रभागक्षेत्र कार्यालय तसेच उपलब्धतेनुसार महापालिकेची प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालये, हजेरीशेड, वाहनतळ येथे ई-कचरा गोळा करण्यासाठी बॉक्स ठेवण्यासाठी जागा उपलब्ध दिली जाणार आहे.