लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : वऱ्हाळा तलावातील गाळात रुतून बुडणाऱ्या अनोळखी तरुणास उमेदवार रेश्मा खोपडे यांचे पती संभाजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाडसाने वाचवले. मात्र, त्यास ठाणे रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यास पोलिसांनी वेळकाढूपणा केल्याने तो तरुण तब्बल दीड तास स्ट्रेचरवर पडून होता, याबद्दल प्रत्यक्षदर्शींनी तीव्र संताप व्यक्त केला. कामतघर येथील वऱ्हाळामाता मंगल भवनात आज उमेदवारांच्या अर्जाची छाननी होती. अर्ज दाखल केलेल्या उमेदवार रेश्मा खोपडे यांचे पती संभाजी खोपडे कार्यकर्त्यांसह परत जात असताना भारत कॉलनीसमोरील कंदील बंधाऱ्याच्या बाजूला त्यांना बघ्यांची गर्दी दिसून आली. तलावातील दलदलीत बुडणाऱ्या तरुणास पाहिल्यावर खोपडे यांनी त्या तरुणास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना एकट्याने हे अशक्य वाटल्याने त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने त्यास दलदलीतून खेचून बाहेर काढले. त्याला रिक्षातून इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयांत नेले. परंतु, त्याची प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी त्यास ठाणे सिव्हिल रुग्णालयात नेण्यास सांगितले. लागलीच खोपडे यांनी स्वखर्चाने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.
बुडणारा तरुण दीड तास स्ट्रेचरवर
By admin | Updated: May 9, 2017 01:02 IST