शहरं
Join us  
Trending Stories
1
विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 
2
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
3
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
4
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
5
गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
6
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
7
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
8
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
9
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
10
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
11
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
12
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
13
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
14
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
15
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
16
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
17
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
18
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
19
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
20
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

दसरा महागला! फुल बाजार ‘सोन्या’ ने सजले; पावसामुळे फुलांची आवक कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 3:47 PM

Kalyan market: कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबाजी पोखरकर यांनी सांगितले की, पावसामुळे फुलांची आवक कमी झाली आहे. बाजारात दरवर्षी झेंडू फुलांच्या एक हजार गाड्या येतात. मात्र यंदा ५०० गाड्या आल्या आहेत. त्यामुळे ५० टक्के फुलांची आवक कमी झाली आहे. 

कल्याण :  साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तानिमित्ताने फूल बाजारात नागरिक जमत आहेत. कल्याणनगरीतील फुल बाजार आपट्याच्या पानांनी (सोन्याने) सजले आहे. फुलबाजार रंगबेरंगी फुले आणि हिरव्या पानांनी बहरल्याचे दिसून आले. कोरोना काळ आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थितीमुळे आवक कमी असून किमती वाढल्या आहेत,  तरीही खरेदी-विक्री सुरू असून बाजारात एक कोटींची उलाढाल झाली. 

बाजारात कापरी, पिवळा, नामधारी, लाल या प्रकारातील झेंडूच्या फुलांची खरेदी-विक्री  होत होती. १०० ते १५० रुपये किलो दराने झेंडूच्या फुलांची विक्री होत आहे. देवीच्या पूजेसाठी वापरली जाणारी शेवंती ३०० रुपये किलो आहे. यासह अस्टर, मोगरा, जाई, जुई, चाफा, गुलछडी, गुलाब, सोनचाफा, जरभरा या फुलांचा बाजार सुरू आहे. वेणी, गजरा बनविण्यासाठी मोगरा, जाई, जुई फुले खरेदी केली जात आहे. यासह झेंडूच्या फुलांचा एक मीटर हार ४० ते ६० रुपये, तोरण ३० ते ५० रुपये, पूजेसाठी लागणारे बेल पान, तुळस, दुर्वा ५ ते १० रुपये जुडीप्रमाणे विकले जात आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबाजी पोखरकर यांनी सांगितले की, पावसामुळे फुलांची आवक कमी झाली आहे. बाजारात दरवर्षी झेंडू फुलांच्या एक हजार गाड्या येतात. मात्र यंदा ५०० गाड्या आल्या आहेत. त्यामुळे ५० टक्के फुलांची आवक कमी झाली आहे. 

घाऊक फुल व्यापारी भाऊ नरवडे यांनी सांगितले की, फुलांची आवक पुणे, अहमदनगर, नाशिक, उस्मानाबाद येथून झाली आहे. फुलांचे दर चढत-उतरत आहेत. शनिवारी, १०० ते १५० रुपये या दराने फुलांची विक्री होत आहे. गुलछडी ४०० रुपये किलो, अस्टर २५० किलो, कापरी १५० किलो, मोगरा ८०० ते एक हजार रुपये किलो, गुलाब २०० रुपये जुडी आहे. सध्या बाजारात एक कोटी रुपयांची उलाढाल सुरू झाली. परंतु, ही उलाढाल मागीलवर्षी दीड ते दोन कोटींची होती. आपट्याच्या पानांना सोनेरी रंग देऊन त्यांना योग्यरित्या पॅकिंग करुन ‘२४ कॅरेट सोने’ म्हणून एक आपट्याचे पान ५ ते १० रुपयांना विकले जात होते. आपट्याची पाने कसारा, आसनगाव, मुरबाड, शहापूर या ठिकाणच्या जंगलाच्या भागातून आणली जात आहेत. आपट्याची पाने २० ते ३० रुपये जुडीप्रमाणे विकली जात आहेत, असे विक्रेत्यानी सांगितले.

टॅग्स :Dasaraदसरा